team india
team india google
क्रीडा | T20 WC

IND vs AFG: टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली! अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

Ankush Dhavre

Team India Playing 11 Against Afghanistan:

भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आपली शेवटची टी -२० मालिका अफगाणिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही प्रमुख फलंदाज भारतीय संघात कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान पहिल्या टी -२० सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११ जाणून घ्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी -२० सामना येत्या ११ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि संजू सॅमसनला संधी मिळणं कठीण आहे. कारण रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून जितेश शर्माला संधी दिली जाऊ शकते. त्याने गेल्या मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली होती.

पहिल्या टी -२० सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येतील. तर टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर कमबॅक करत असलेला विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.

तर तिलक वर्मा चौथ्या आणि यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. मिस्टर फिनिशर म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंग या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

या गोलंदाजांना मिळू शकते संधी..

फिरकी गोलंदाज म्हणून या सामन्यात रवी बिश्नोई आणि अक्षर पटेलला संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा ((कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्वोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि आवेश खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri Sub Way News: मुंबईतील सब-वे पावसामुळे पाण्याखाली...

Marathi Live News Updates: उद्या नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

Terrorist Attack: कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमक सुरू

Pm Modi Russia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रशियात भव्य स्वागत, विमानतळावर गार्ड ऑफ ऑनरने सन्मान

Supriya Sule News: तुतारी चिन्हावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

SCROLL FOR NEXT