टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा तब्बल ४७ धावांचा पराभव करत सुपर ८ फेरीतील आपला पहिला विजय मिळवला. संथ खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणितानचा संघ १३४ धावांवर ढेपाळला.
भारताच्या विजयाचे सर्वात मोठे हिरो ठरले ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह. एकीकडे सूर्यकुमारने २९ चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी केली, तर दुसरीकडे बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत ४ षटकात केवळ ७ धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या.
वेस्ट इंडिजच्या संथ खेळपट्टीवर टीम इंडियाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याला हार्दिक पांड्याने ३२ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.
अखेरच्या काही षटकात अक्षर पटेलने जबरदस्त फलंदाजी करत टीम इंडियाची धावसंख्या १८० धावांच्या पार नेली. अफगाणिस्ताकडून राशिद खान आणि फजल फारुखीने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली.
बुमराहने पावर प्लेमध्ये अफगाणिस्तानच्या टॉप ऑडरला माघारी पाठवले. एकवेळ अपगाणिस्तानची ३ बाद २३ अशी होती. त्यानंतर ओमरझाई आणि जादरानने ४० धावांची भागीदारी करत विकेट्सची पडझड रोखली. मात्र कुलदीप यादवने ही जोडी फोडत अफगाणिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
त्यानंतरअपगाणिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आली नाही. अखेर अफगाणिस्तानचा संघ निर्धारित २० षटकात सर्वबाद १३४ धावाच करू शकला. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. आता सुपर-८ फेरीत टीम इंडियाचा पुढील सामना बांग्लादेशसोबत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.