team india saam tv news
Sports

IND vs AFG: पहिल्या टी-२० सामन्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

Team India, Playing 11 Prediction: येत्या काही महिन्यात भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Ankush Dhavre

India vs Afghanistan, 1st T20I:

येत्या काही महिन्यात भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

मालिकेतील पहिला टी -२० सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये कोणाला स्थान मिळणार अशी चर्चा सुरू आहे. या सामन्यासाठी दोन खेळाडूंची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र दोघांपैकी एकालाच प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकते. कोण आहेत ते दोन खेळाडू? जाणून घ्या.

आक्रमक सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय. १५ टी -२० सामन्यांमध्ये त्याने १५९ च्या स्ट्राईक रेटने ४३० धावा चोपल्या आहेत. आपल्या छोट्या कारकिर्दीत त्याने १ शतक आणि २ अर्धशतक झळकावली आहेत. तर शुभमन गिलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १३ टी-२० सामन्यांमध्ये १४५.१२ च्या स्ट्राईक रेटने ३१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं आहे.

कोणाला मिळणार संधी?

जर भारतीय संघाने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनने मैदानात उतरण्याचा प्लान केला तर रोहितसोबत यशस्वी जयस्वालला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. यशस्वी जयस्वाल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो रोहितसोबत फलंदाजीला आला तर तो संघाला पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात करुन देऊ शकतो. (Latest sports updates)

आयपीएलमध्ये दमदार खेळ..

यशस्वी जयस्वालने आयपीएल स्पर्धेतही दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने या स्पर्धेतील ३७ सामन्यांमध्ये १४८.७३ च्या सरासरीने ११७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या नावे १ शतक आणि ८ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. तर १२४ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा एक्स फॅक्टर ठरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT