IND vs ZIM, Match Timings: भारत- झिम्बाब्वे टी-20 मालिकेतील सामने भारतात किती वाजता पाहता येतील?
ind vs zim twitter
क्रीडा | T20 WC

IND vs ZIM, Match Timings: भारत- झिम्बाब्वे टी-20 मालिकेतील सामने भारतात किती वाजता पाहता येतील?

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ ५ टी -२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. या मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलवर सोपवण्यात आली आहे.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजाने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे हे खेळाडू यापुढे टी -२० संघात दिसून येणार नाहीत. तर वर्ल्डकप संघात असलेल्या खेळाडूंना वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती दिली गेली आहे.

किती वाजता सुरू होतील सामने?

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात होणाऱ्या मालिकेला ६ जुलैपासून सुरुवात होणार आहे. हा सामना शनिवारी आणि रविवारी (७ जुलै) होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना बॅक टू बॅक सामने पाहायला मिळणार आहेत. हे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरू होतील. तर सामन्याचं नाणेफेक संध्याकाळी ४ वाजता होईल. हे सामने ७:३० ते ८ वाजेपर्यंत समाप्त होतील.

यापूर्वी आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सामने रात्री ८ वाजता सुरू होत होते. तर काही सामने सकाळी ६ वाजता सुरू होत होते. आता क्रिकेट चाहत्यांना नव्या वेळेत सामने पाहायला मिळणार आहेत. दरम्यान हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहेत.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ :

शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा , आवेश खान, खलील अहमद.

झिम्बाब्वे-

रजा सिकंदर (कर्णधार), अकरम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जॉनथन, चतारा टेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसेंट, मडेंडे क्लाइव, मसाकाद्जा वेलिंगटन, मावुता ब्रँडन, मुजाराबानी ब्लेसिंग, मायर्स डायन, नकवी अंतुम, नगारवा रिचर्ड, शुम्बा मिल्टन, मधेवेरे वेस्ली, मारुमानी तदीवानाशे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari : जुई गडकरी म्हणजे सौंदर्याची खाण...

Mumbai Local Train News: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत; गाड्या 10-15 मिनिटे उशिरा

CNG -PNG Price: सीएनजी-पीएनजीच्या दरात होणार वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; जाणून घ्या नवे दर

Marathi Live News Updates: मालेगाव-मनमाड रोडवरील नांदगाव फाटाजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात

VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका, राजेश शहा यांना जामीन मंजुर

SCROLL FOR NEXT