team-india saam tv news
Sports

IND VS SA: द.आफ्रिका दौऱ्यावर या ३ खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण

Team India Playing 11: टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात ३ खेळाडू असे आहेत ज्यांना संधी मिळणं कठीण आहे.

Ankush Dhavre

India Tour Of South Africa:

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे, ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यावर सूर्यकुमार यादवची टी-२० संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर केएल राहुल वनडे आणि रोहित शर्मा कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात ३ खेळाडू असे आहेत ज्यांना संधी मिळणं कठीण आहे.

तिलक वर्मा..

भारतीय संघातील फलंदाज तिलक वर्माला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. या मालिकेत त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही. कारण या दौऱ्यावर यशस्वी जयस्वाल,शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड,सूर्यकुमार यादव,रिंकू सिंग आणि श्रेयस अय्यरसारखे फलंदाज आहेत. हे खेळाडू असताना तिलक वर्माला संधी मिळणं कठीण आहे.

वॉशिंग्टन सुंदर..

भारतीय संघातील फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं खूप कठीण आहे. कारण या मालिकेसाठी भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली आहे. कुलदीप यादव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव ही जोडी मैदानावर उतरल्यास वॉशिंग्टन सुंदरला संपूर्ण मालिकेत बाकावर बसावं लागेल. (Latest sports updates)

अर्शदीप सिंग..

या मालिकेत वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही संधी मिळणं कठीण आहे. कारण या मालिकेसाठी मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दिपक चहरसारख्या गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. हे ३ प्रमुख गोलंदाज संघात असताना अर्शदीप सिंगला आपल्या संधीची वाट पाहावी लागेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर,कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT