ind vs ban asia cup  Saam tv
Sports

Ind vs Ban : आधी फटकेबाजी नंतर घुसरगुंडी; हार्दिक-अक्षरची संयमी खेळी, बांगलादेशसमोर इतक्या धावांचं आव्हान

ind vs ban asia cup : हार्दिक-अक्षरची संयमी खेळीनं भारताला सावरलं आहे. भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचं आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचं आव्हान

अभिषेक शर्माने तुफानी अर्धशतक

हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलने शेवटच्या षटकांमध्ये महत्त्वपूर्ण धावा

भारताने आज सामना जिंकला तर अंतिम फेरीतील तिकीट निश्चित होणार

आशिया कप २०२५ स्पर्धेत टीम इंडिया आणि बांगलादेशसोबत रोमांचक सामना सुरु आहे. बांगलादेशनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने बांगलादेशसमोर १६९ धावांचं आव्हान दिलं. अभिषेक शर्माने तुफानी अर्धशतक पूर्ण केलं.

भारताने आजचा सामना जिंकल्यास अंतिम सामन्याचं तिकीट कन्फर्म होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशने सुपर-४ मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी फारशी चांगली सुरुवात केली नाही. पहिल्या षटकात गिल आणि अभिषेकने फक्त ३ धावा कुटल्या. त्यानंतर दोघांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केली. गिलने चौथ्या षटकानंतर चौकार-षटकार लगावण्यास सुरुवात केली.

भारताला ७ व्या षटकात पहिला झटका बसला. शुभमन गिल २९ धावा करून तंबूत परतला. दुसरीकडे अभिषेकने आक्रमक खेळ दाखवत २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पुढे ९ व्या षटकात भारताला दुसरा झटका बसला. भारताच्या शिवम दुबेने २ धावा केल्या. १२ व्या षटकात भारताला तिसरा झटका बसला. अभिषेकने ३७ चेंडूत ७५ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादव देखील १२ व्या षटकात बसला. तिलक शर्मा देखील स्वस्तात माघारी परतला. तिलक शर्मा हा ५ धावांवर बाद झाला.

भाराताचा डाव हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलने सावरला. दोघांच्या भागीदारीमुळे धावसंख्या १६८ पर्यंत पोहोचली. अभिषेकची स्फोटक फलंदाजी आणि हार्दिक-अक्षरच्या संयमी खेळीमुळे भारताच्या धावसंख्या १६८ पर्यंत पोहोचवण्यास यश आलं. भारताने दिलेल्या आव्हानानंतर गोलंदाज काय कमाल करतात, हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT