भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे भारतीयांसाठी मैदानावरच एक युद्धचं... मात्र यावेळी भारताबाहेर दुबईत झालेला भारत-पाकिस्तान सामना रणभूमीवरच्या खऱ्या युद्धानंतरचा सामना होता.. सुरवातीपासूनच सामान्य भारतीयांना या सामन्याच्या विरोधात सुर लावल्याचं चित्र पाहायला मिळत होत.
सामन्याच्या टॉसवेळी सुर्यकुमार यादवनं पाकिस्तान कर्णधारासोबत हस्तादोलंन करणं टाळलं.. दुसरीकडे विजयानंतरही भारतीय संघाची वाट पाहणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष करत भारतीय क्रिक्रेटपटूंनी ड्रेसिंगरुमचे दरवाजे बंद केले..
देशभरातून या मॅचविरोधात विरोधकांनी रानं उठवलं.. आम्ही या सामन्यावर थुंकतो, अशा शब्दात राऊतांनी सामन्यावर टीका केली. तर दुसरीकडे आपनेही सत्ताधाऱ्यांच्या नॅरेटिव्हवर प्रहार केला...
दरम्यान सामन्याआधी भारतीय संघातील खेळाडूही हा सामना खेळण्यास उत्सुक नसल्याची चर्चा आहे. मात्र बीसीसीआयने खेळवलेल्या या सामन्यांनंतर पाकिस्तानला 25 हजार कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करत राऊतांनी BCCI आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच संशय व्य़क्त केलाय...
याआधी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाचा विजय देशातील नागरिकांकडूनही जल्लोषात साजरा केला जायचा.. मात्र यावेळी क्रिक्रेटप्रेमीनीही काही अंशी या सामन्याकडे पाठ फिरवल्याचंच चित्र होतं.. त्यामुळे भारतानं हा सामना जिकंला असली तरी पाकिस्तानचे पहलगामचे नापाक कारनामे भारतीय विसरलेले नाहीत...हे निश्चित.. भारत-पाकिस्तान युद्धानंतरचा हा सामना मैदानात जरी जिंकला गेला असला तरी भारतीयांच्या मनात मात्र हरलाय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.