India-Pakistan Match Inside Sport
Sports

India-Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीत रंगणार थरार; भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; कधी होणार सामने?

India-Pakistan Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात एक मोठा अपडेट समोर आलीय. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्याची तारीख पीसीबीने निश्चित केलीय.

Bharat Jadhav

पुढील आयसीसी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी होणार आहे. ही स्पर्धा २०२५ मध्ये होणार असून ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. मात्र पाकिस्तान या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामने होणार आहेत. या स्पर्धेतील दोन्ही देशांमधील सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार यासंदर्भात बातमी समोर आलीय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख १ मार्च २०२५ निश्चित केलीय. पीटीआयच्या वृत्तानुसार, आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल.

मात्र तात्पुरत्या वेळापत्रकाला बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाहीये. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होतील. तर १० मार्च हा राखीव दिवस म्हणून ठेवला जाईल. अहवालानुसार भारताला पाकिस्तान बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT