IND vs IRE Saam Tv
Sports

भारताने केला पहिल्या T20 मध्ये आयर्लंडचा ७ विकेट्सने पराभव

आयर्लंडच्या संघाने १०८ धावा केल्या. हॅरी टॅक्टरने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या.

Santosh Kanmuse

डब्लिंग : भारताने (India) आयर्लंडविरुद्ध ७ विकेटने विजय मिळवला. डब्लिन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने आयर्लंडचा ७ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने १०९ धावांचे लक्ष्य ९.२ षटकात पूर्ण केले.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील हा पहिला सामना होता. हा सामना डब्लिनमध्ये खेळला गेला जिथे भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे होती. हार्दिकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना १२-१२ षटकांचा केला. पावसामुळे षटक कमी करण्यात आले. (IND vs IRE)

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या संघाने १२ षटकांत १०८ धावा केल्या. हॅरी टॅक्टरने सर्वाधिक नाबाद ६४ धावा केल्या. भारताकडून (India) युझवेंद्र चहलने चांगली कामगिरी केली. त्याने ३ षटकात ११ धावा देऊन १ बळी घेतला. त्यानंतर १०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची धमाकेदार सुरुवात झाली.

सलामीला आलेल्या इशान किशनने अवघ्या ११ चेंडूत २६ धावा केल्या. नंतर दीपक हुडा आणि कर्णधार हार्दिक पांड्याने धावसंख्या ९४ धावांपर्यंत नेली. हार्दिक पांड्याने बाद होण्यापूर्वी १२ चेंडूत २४ धावा केल्या. भारताकडून दीपक हुडाने चांगली खेळी करत सर्वाधिक धावांचे योगदान दिले. हुडाने २९ चेंडूत ४७ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT