Mental Stress : मानसिक तणावापासून आपल्या नात्याला दूर कसे ठेवाल ?

बदलेल्या जीवनशैलीनुसार व कामकाजामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात.
Mental Stress Can Affect Your Relationship, overcome stress, how to relieve stress quickly, Relationship Tips
Mental Stress Can Affect Your Relationship, overcome stress, how to relieve stress quickly, Relationship Tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : बदलेल्या जीवनशैलीनुसार व कामकाजामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक बदल होत असतात. कामाच्या तणावामुळे अधिक तर आपली चिडचिड होत असते.(how to manage stress)

हे देखील पहा -

बऱ्याच वेळा कामाच्या गडबडीमुळे आपण आपल्या कुटुंबाला (Family) व जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आपली सतत चिडचिड होते. कामाच्या व्यापामुळे घरातही नीटसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या इतर नात्यांवरही (Relation) होऊ लागतो. कुटुंबाला किंवा जोडीदाराला पुरेसा वेळ न दिल्यामुळे आपल्या नात्यात त्यामुळे खटके उडू लागतात. अधिक तणावामुळे आपण आपल्या जोडीदाराला शंकेच्या नजरेने सतत बघत असतो. अनेक गैरसमजामुळे आपल्या नात्यात दूरावा येतो. त्यासाठी आपण आपला मानसिक ताण कसा दूर ठेवून नात्यात आपलेपणा आणाल हे जाणून घेऊया.

१. तणावामुळे आपल्या नात्यावर परिणाम होत असेल तर आपण त्यावेळी एकमेकांना वेळ देणे अधिक गरजेचे आहे. तसेच आपण मिळालेल्या वेळेत एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्या. आपले नाते अधिक मजूबत कसे होईल यावर अधिक भर द्या.

Mental Stress Can Affect Your Relationship, overcome stress, how to relieve stress quickly, Relationship Tips
डेटिंग आणि रिलेशनशीपमध्ये नेमका फरक काय जाणून घ्या

२. प्रत्येक वेळी आपल्या जोडीदारावर आरोप करणे चुकीचे आहे. जोडीदाराला समजून घ्या. कामामुळे त्यांची अधिक चिडचिड होते व त्यामुळे ते आपल्यावर त्याचा राग काढतात. तसेच त्यांच्यावर वेळोवेळी शक घेणे बंद करा त्याचा आपल्या नात्यावर विपरीत परिणाम होऊ शकते.

३. आपल्या जोडीदाराची कोणतीही गोष्ट आपल्याला खटकत असेल तर आपण त्याला ते समजवून सांगणे गरजेचे आहे. त्या गोष्टीवर त्याचे मत काय आहे हे देखील जाणून घ्या. त्यांना चांगले-वाईट बोलण्याआधी विचार करा. कोणत्याही नात्यात व्यक्त होणे अधिक गरजेचे आहे. त्यासाठी व्यक्त व्हा.

४. मानसिक तणाव का आला आहे किंवा आपल्या सतत चिडण्याचे कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातून कोणता मार्ग मिळतो का हे पहा. आपण आपले प्रश्न सोडवू शकत नसू तर मोठ्या व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com