विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडवर ५ विकेटने विजय मिळवला. /BCCI/x saam tv
Sports

Ind vs NZ Highlights : पावसाचा अडथळा आणि किंग कोहलीचं तुफान...भारतानं पहिल्याच वनडेत न्यूझीलंडला लोळवलं

india beat new zealand first ODI : पाऊसही भारताचा विजयीपथ रोखू शकला नाही. किंग कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पहिल्याच वनडेत न्यूझीलंडला पाच विकेट्सनं मात दिली.

Nandkumar Joshi

पावसाच्या सरींचा अडथळा आणि किंग कोहलीच्या तुफानानं न्यूझीलंडला पहिल्याच वनडेत पराभवाचा जोरदार तडाखा दिला. भारतानं हा सामना पाच विकेट राखून जिंकला. न्यूझीलंडने पहिली फलंदाजी करताना अवघ्या १८५ धावा केल्या. भारतासमोर फक्त १८६ धावांचं लक्ष्य होतं. पण दोनदा पावसाचा व्यत्यय आला आणि षटके कमी करण्यात आली. भारताला ३२ षटकांत १४३ धावा करायच्या होत्या. त्या २२.४ षटकांत पाच विकेट राखून केल्या. भारतानं या विजयासह १-० ची आघाडी मिळवली आहे.

न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली

न्यूझीलंडची फलंदाजी साजेशी झाली नाही. ११ पैकी ५ फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकले. टिम सायफर्ट यानं ३८ आणि डेरिल मिचेल यानं २८ धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्स यानं ३० धावा केल्या. जेकब डफी यानं अवघ्या १५ धावा केल्या. अखेरीला येऊन ब्लेअर टिकनर यानं वेगवान फलंदाजी केली. त्यानं २३ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. त्यानं चार उत्तुंग षटकार ठोकले. ब्लेअरनं ही तुफानी खेळी केली नसती तर कदाचित न्यूझीलंडला १५० धावा करणेही कठीण होते.

भारताची वादळी गोलंदाजी

भारताकडून खोचक गोलंदाजी केली. अर्शदीप सिंग यानं १० षटकांत ७० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. अंशुल कंबोज यानं गोलंदाजीनं सगळ्यांनाच प्रभावित केलं. १० षटकांत अवघ्या २२ धावा खर्च केल्या आणि दोन विकेट घेतल्या. गुरनूर बरार यानं ९.२ षटकांत ३ विकेट घेतल्या. त्या मोबदल्यात ४४ धावा दिल्या. अक्षर पटेल आणि आकिब नबी यांना विकेट मिळू शकला नाही. नबी यानं सहा षटकांत ३३ धावा दिल्या. तर पटेल यानं ५ षटकांत १२ धावा दिल्या.

विराट कोहलीचं अर्धशतक, रोहित शून्यावर बाद

भारताकडून अनुभवी फलंदाज विराट कोहलीनं जबरदस्त खेळी केली. भारताकडून सलामीला आलेल्या रोहित शर्माला एकही धाव करता आली नाही. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या कोहलीने शुभमन गिलसोबत भागीदारी रचली. गिलने ५६ चेंडूंत ३७ धावा केल्या. कोहलीनं तुफानी फलंदाजी सुरूच ठेवली. कोहलीने अवघ्या ५१ चेंडूंत ७४ धावांची खेळी केली. त्यानं १३ चौकार आणि एक षटकार ठोकला. श्रेयस अय्यरला १५ धावाच करता आल्या. अक्षर पटेल शून्यावर बाद झाला. तर राहुलने तीन धावा केल्या आणि नाबाद राहिला. नमन धीर यानंही ५ धावा केल्या. त्यानं एक चौकार ठोकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या; राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Pension Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट! सरकारकडून नवीन नियम जाहीर

मोदी सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट! अग्निवीर योजनेत मोठा बदल; मिळेल कायमस्वरूपी नोकरी अन् वाढीव वेतन

दिवाळीच्या तोंडावर साखरेचा गोडवा महागला! आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?

Maharashtra News Live Update : वाहनधारकांसाठी मोठा दिलासा! थकीत चलनावर २० टक्क्यांपर्यंत सवलत; महाराष्ट्रात अभय योजना लागू होणार

SCROLL FOR NEXT