Team India A England Tour : File Photo saam tv
Sports

India A team Squad : इंग्लंड दौऱ्यासाठी भारत अ संघ जाहीर, युवा खेळाडूकडं नेतृत्व सोपवलं

India team vs England : भारत आणि इंग्लंड या दोन दिग्गज संघांत कसोटी मालिका होणार आहे. त्याआधीच इंडिया ए आणि इंग्लंड लायन्स या दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने इंडिया ए संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमधील अनेक दिग्गज खेळाडूंना यात संधी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्यास अवधी आहे. त्याआधी इंडिया ए संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी १६ मे रोजी संघ जाहीर केला आहे. मेन्स सिनीअर सिलेक्शन कमिटीने इंग्लंड लायन्सच्या विरोधात प्रथम श्रेणी सामन्यासाठी इंडिया ए संघाचा चमू घोषित केला आहे. या संघाचं नेतृत्व अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे सोपवलं आहे. तर करुण नायर आणि इशान किशनचं या संघात पुनरागमन झालं आहे.

भारत पाकिस्तान तणावामुळं आयपीएल २०२५ स्थगित केली होती. मात्र, आता ती उद्या, शनिवार, १७ मेपासून सुरू होत आहे. त्याच्या एक दिवस आधीच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी दोन प्रथम श्रेणी सामने आणि टीम इंडियासोबत सराव सामन्यासाठी इंडिया ए संघाची निवड केली आहे. बंगालचा अनुभवी फलंदाज अभिमन्यू ईश्वरन याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या इंडिया ए संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडं होतं. मात्र, यावेळी त्याच्याकडे नेतृत्व नसेल. त्याला संघात स्थान दिलेले आहे.

३० मेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संघात अनुभवी फलंदाज करुण नायरला संधी देण्यात आली आहे. मागील मोसमात प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६०० पेक्षा जास्त धावा आणि नऊ शतके झळकावणाऱ्या करूण नायरला टीम इंडियात संधी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. भारत - इंग्लंड कसोटी मालिकेआधी इंडिया ए मध्ये नायरला संधी मिळणे महत्वाचे मानले जाते. या मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली तर, कसोटी संघात त्याला संधी मिळू शकते.

इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया ए संघ

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव जुरेल, यशस्वी जयस्वाल, करूण नायर, नितीशकुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, ईशान किशन, मानव सुतार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे आणि हर्ष दुबे.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दोघे दुसऱ्या सामन्यापासून उपलब्ध असणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT