Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच हिटमॅननं मन मोकळं केलं, मी अजूनही क्रिकेट...

Rohit Sharma Stand In Wankhede Stadium : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा हिटमॅन रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
Rohit Sharma
Rohit SharmaX
Published On

Rohit Sharma Stand : सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंच्यानंतर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्माच्या नावाचे स्टँड दिसणार आहे. आज वानखेडेवर भव्यदिव्य सोहळा पार पडला. या सोहळ्यात रोहित शर्माच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रोहित शर्माचे आई-बाबा, त्याची पत्नी उद्धाटन सोहळ्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हजर राहिले होते. उद्घाटन सोहळ्यासाठी त्याच्या आई-वडिलांना मंचावर बोलवण्यात आले. रोहित स्वत: व्यासपीठावरुन खाली उतरला आणि आई-वडील आणि त्याची पत्नी रितिकाला व्यासपीठावर घेऊन आला. या कृतीने त्याने सर्वांची मन जिंकले.

Rohit Sharma
दारु पिऊन नवरा बनला सैतान; बेदम मारहाण करुन बायकोला छतावरुन उलटं लटकवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

कार्यक्रमावेळी रोहितने मनातील भाव व्यक्त केला. 'आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. एक लहान मुलगा जो, भारताकडून खेळायचे स्वप्न पाहत होता, त्याने स्वप्न पूर्ण केले. वानखेडेसारख्या ऐतिहासिक स्टेडियमवर माझ्या नावाने स्टँड असेल असे मला वाटले नव्हते. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांसह जगातील श्रेष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या शरद पवार यांच्यासह माझे नाव दिसत आहे हे मला छान वाटत आहे', असे रोहित म्हणाला.

Rohit Sharma
मानेवर चाकूचे व्रण, तोंडात LPG पाइप टाकला अन्...; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

मी अजूनही क्रिकेट खेळतोय, एका फॉरमॅटमध्ये खेळतोय. आजच्या सोहळ्यात माझं कुटुंब हजर आहे. माझ्या यशात त्यांचा मोठा वाट आहे. त्यांचे कष्ट, त्याग यामुळे मी इथवर आलो, त्यांच्यामुळेच मी तुमच्यासमोर उभा आहे. शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस यांचे आभार असे वक्तव्य रोहित शर्माने केले. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर पहिल्यांदाच रोहितने मनातील भावना सर्वांसमोर मांडल्या.

Rohit Sharma
Ravi Shastri : मी कोच असतो तर...रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरून होणार राडा, रवी शास्त्रींचा गौतम गंभीरवर अप्रत्यक्ष निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com