मानेवर चाकूचे व्रण, तोंडात LPG पाइप टाकला अन्...; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

Crime News : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे. हत्या केल्यानंतर तिच्या तोंडात LPG पाइन टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
crime news
crime newsX
Published On

एका २७ वर्षीय महिलाचा मृतदेह तिच्या भाड्याच्या घरात आढळला. हत्या केल्यानंतर आरोपीने महिलेच्या तोंडात एलपीजी पाइप टाकला आणि तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांना महिलेची ओळख पटवण्यात यश आले आहे. हत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

बिहारच्या पटनामधील एसके पुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. संजना सिंह असे मृत महिलेचे नाव आहे. ती मूळची मुझफ्फरपूरची रहिवासी होती. संजना स्पर्धा परीक्षांची तयारी करत होत. सचिवालयामध्ये संजनाला नोकरी मिळाली होती, ती जून महिन्यापासून तेथे कामावर रुजू होणार होती. मागील पाच महिन्यांपासून संजना एसके पुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदपुरी परिसरातील मनोरमा अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या गल्लीत भाड्याच्या घरात पाहत होती.

crime news
Pahalgam हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा! अमेरिकेनं भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय? कसा रचला पहलगामचा कट?

संजनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला. तिच्या मानेवर चाकूचे वार आहेत, तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा संजनाच्या कुटुंबियांनी केला आहे. संजनाचा भाऊ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक आहे. माझ्या बहिणीच्या तोंडात एलपीजी पाइप टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे संजनाच्या भावाने म्हटले आहे.

crime news
दारु पिऊन नवरा बनला सैतान; बेदम मारहाण करुन बायकोला छतावरुन उलटं लटकवलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. फॉरेन्सिक टीमद्वारे घटनास्थळाचा तपास केला. एफएसएल टीम घटनास्थळावरन पुरावे गोळा करत आहे. त्यांना बेडशीटवर रक्ताचे डाग आढळले आहेत. आरोपीची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

crime news
Pune Crime : उज्वला वारुळे मृत्यूप्रकरण! ती आत्महत्या नव्हती तर..., ओढणीमुळे कोडं उलगडलं, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com