ind vs pak twitter
क्रीडा

IND-W vs PAK-W: पाकिस्तानचा डाव फसला, श्रेयंका पाटील-अरुंधतीपुढे लोटांगण, भारतापुढे माफक आव्हान

Ankush Dhavre

India vs Pakistan, ICC Womens T20 World Cup 2024 Live: दुबईच्या उन्हात भारतीय रणरागिनींनी पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. पहिला सामना गमावून मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला सुरुवातीलाच लागोपाठ धक्के दिले. या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानच्या महिला संघाला २० षटकअखेर १०५ धावा करता आल्या आहेत. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १०९६धावांची गरज आहे.

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील सातव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेत जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. रेणुका सिंगने फेरोजाची दांडी गुल केली. त्यानंतर पाकिस्तानच्या विकेट्सची रांग लागली. पाकिस्तानला २० षटकअखेर अवघ्या १०५ धावा करता आल्या.

पाकिस्तानकडून फलंदाजी करताना निदा दारने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजीला आलेल्या मुनीबा अलीने १७ धावा केल्या. शेवटी कर्णधार फातिमा सनाने १३ धावा केल्या. पाकिस्तानच्या कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

पाकिस्तानला १०५ धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अरुंधती रेड्डीने १९ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर श्रेयंका पाटीलने २ फलंदाजांना माघारी धाडलं. तर रेणुका सिंग, दिप्ती शर्मा आणि आशा सोभानाने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दिप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंग

पाकिस्तान महिला संघाची प्लेइंग ११: मुनीबा अली (यष्टीरक्षक), गुल फिरोज़ा, सिदरा अमीन, निदा डार, आलिया रियाज, ओमेमा सोहेल, फातिमा सना (कर्णधार), तुबा हसन, नशरा संधू, सैयदा अरूब शाह, सादीया इकबाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

SCROLL FOR NEXT