ICC Women's T20 World Cup 2024: आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध पार पडला. हा सामना भारतीय संघाला ५८ धावांनी गमवावा लागला आहे. या सामन्यात फलंदाजांसह क्षेत्ररक्षकांनीही बऱ्याच चुका केल्या. या पराभवाचा सामना भारतीय संघाला गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.
या विजयासह न्यूझीलंडचा संघ ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी आहे. तर श्रीलंकेला धूळ चारणारा पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार कामगिरी करत ३१ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघ अजूनही स्पर्धेत टीकून आहे. मात्र एकही सामना गमावला, तर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो.
ग्रुप ए मध्ये न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेशचा संघ अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशने सलामीच्या लढतीत स्कॉटलंडला १६ धावांनी पराभूत करत शानदार विजय मिळवला होता. या विजयासह बांगलादेशने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्टइंडीजला १० गडी राखून पराभूत केलं.
भारत- पाकिस्तानात रंगणार निर्णायक सामना
भारतीय संघाला पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दुसरा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना ६ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. भारतीय संघाला जर सेमीफायनलमध्ये जायचं असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.