smriti mandhana twitter
Sports

IND-W vs IRE-W: सांगली एक्स्प्रेस सुसाट..Smriti Mandhana ने झळकावलं वनडेतील सर्वात वेगवान शतक

Smriti Mandhana Fastest ODI Century: भारतीय संघातील स्टार फलंदाज स्म्रिती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत रेकॉर्डब्रेक शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

स्म्रिती मंधानाची बॅट चांगलीच तळपली आहे. भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेत स्म्रिती मंधानाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे.

आता तिने आयर्लंडविरुद्ध खेळताना सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत तिने अवघ्या ७० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे.

तिने हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. यापूर्वी हरमनप्रीत कौरने ८७ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं होतं.

स्म्रिती मंधानाची रेकॉर्डब्रेक खेळी

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजीला येताच, स्म्रिती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला. तिने ताबडतोड फलंदाजी करत प्रतिका रावलसोबत मिळून पावरप्लेमध्ये ९० धावा जोडल्या. या दोघींनी मिळून अवघ्या ७७ चेंडूत शतकी भागीदारी केली.

स्म्रितीने ३९ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकार खेचत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर पुढील ३१ चेंडूत आणखी ५० धावा जोडत तिने आपलं शतक पूर्ण केलं. या शतकी खेळीदरम्यान तिने ४ षटकार आणि ९ चौकार खेचले.

स्म्रिती मंधानाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

स्म्रिती मंधानाने या शतकी खेळीसह आणखी एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ती वनडे क्रिकेटशमध्ये १० शतकं झळकावणारी पहिलीच डावखुऱ्या हाताची फलंदाज ठरली आहे. यापूर्वी देखील काही फळंदाज आहेत ज्यांनी १० शतकं झळकावली आहेत. मात्र ते उजव्या हाताचे फलंदाज आहेत.

स्म्रिती मंधाना सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तिची गेल्या १० वनडे सामन्यातील कामगिरी पाहिली, तर तिने ६ अर्धशतकं आणि २ शतकं झळकावली आहेत. या डावात फलंदाजी करताना तिने ८० चेंडूत १३५ धावा चोपल्या. तिच्याकडे दुहेरी शतक झळकावण्याची संधी होती. मात्र ती बाद होऊन माघारी परतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT