IND W vs AUS W Test  Saam Tv
Sports

IND W vs AUS W Test : भारतीय महिला क्रिकेट संघानं इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पहिल्यांदाच विजय

India Women Team win against Australia : पहिल्या डावात भारताने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती.

प्रविण वाकचौरे

IND W vs AUS W Test :

भारतीय महिला संघाने प्रथमच ऑस्ट्रेलियाचा कसोटीमध्ये पराभव केला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवशी आठ गडी राखून हा विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारताने 406 धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 219 धावा केल्या.

टीम इंडियाकडे (team india) पहिल्या डावात 187 धावांची आघाडी होती. त्यानंतर फॉल ऑनसग मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने (Australia Cricket Team) दुसऱ्या डावात 261 धावा केल्या. अशारितीने भारताला 75 धावांचे लक्ष्य मिळालं होतं. टीम इंडियाने हे लक्ष्य दोन गडी गमावून पूर्ण केले. (Latest sports updates)

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना (Test Cricket) खेळला गेला. भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा आणि दुसऱ्या डावात 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारताकडून (Team India) चमकदार कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियन संघ (Australia vs India) पहिल्या डावात 219 धावांवर गारद झाला होता. यानंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाला काही खास करता आले नाही. संपूर्ण संघ 261 धावा करून ऑलआऊट झाला.

ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि दुसरा डाव

पहिल्या डावात ताहलिया मॅग्राने अर्धशतक झळकावलं. तिने 56 चेंडूत 50 धावांची खेळी केली. मूनीने 40 तर हेलीने 38 धावांची खेळी केली. भारताकडून (Indian Women's cricket Team) पूजा वस्त्राकरने चार आणि स्नेह राणाने तीन बळी घेतले. तर दीप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात पुन्हा मॅग्राने सर्वाधिक 73 धावांची खेळी केली. तर एलिस पेरीने 45, मूनीने 33, हेलीने 32 धावांची खेळी केली. भारताकडून स्नेह राणाने दुसऱ्या डावात चार विकेट घेतल्या. तर राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकरने एक विकेट घेतली.

टीम इंडियाची कामगिरी

भारताकडून पहिल्या डावात दीप्ती शर्माने 78 धावा, स्मृती मानधनाने 74 धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने 73 धावा आणि ऋचा घोषने 52 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात स्मृती मंधानाने भारताकडून सर्वाधिक नाबाद 38 धावा केल्या. रिचा अंजनाने 13 धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 12 धावा करुन नाबाद राहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT