IND vs ZIM x
Sports

IND vs ZIM: मुकेश कुमार आणि आवेश खानच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वे ढेर; १०० धावांनी टीम इंडियाचा विजय

IND vs ZIM T20 Team India Won: भारत आणि झिम्बाब्वेच्या संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका होत आहे. आज या मालिकेचा दुसरा सामना झाला. भारतीय संघाने झिम्बाब्वेच्या संघासमोर विजयासाठी २३५ धावांंचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना भारतीय गोलंदाजीशी दोन हात करण्यात झिम्बाब्वे संघ अपयशी ठरला.

Bharat Jadhav

भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेत झिम्बाब्वेला मात दिलीय. अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी दिमाखदार कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताने दिलेल्या २३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इिम्बाब्वेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. पण नंतर एकामोगून एक विकेट पडत गेल्या.

आवेश खानने आपला इंगा दाखवत झिम्बाब्वेच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले. आवेश खानने १५ धावा देत ३ बळी घेतले तर मुकेश कुमारने पहिला ब्रेक थ्रो मिळवून देत तीन बळी घेतले. कुमारने ३७ धावा देत झिम्बाब्वेचे ३ फलंदाज बाद केले. दुसऱ्या टी-२०मध्ये भारताने झिम्बाब्वेला हरवून मालिकेत बरोबरी केलीय. टीम इंडियाचा कर्णधार गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकात २३४ धावा केल्या होत्या. भारताकडून अभिषेक शर्माने १००, ऋतुराजने ७७ आणि रिंकू सिंहने ४८ धावा केल्या होत्या.

भारताने दिलेल्या २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ केवळ १३४ धावांच करु शकला. भारताकडून आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. रवी बिश्नोईनेही दोन गडी बाद केले.

दरम्यान सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा युवा कर्णधार शुबमन गिल खूपच आनंदी दिसत होता. गिलने शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माचे कौतुक केलं. तर अवघ्या ४६ चेंडूत शतक करणाऱ्या अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द मॅच असं घोषित करण्यात आलं. अभिषेकने २१२.७७ च्या स्ट्राईक रेटने धावा करत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक झळकावलं.

मी खूप आनंदी आहे, पुन्हा विजयी लयीत परतणे खूप छान आहे. अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, विशेषत: पॉवरप्लेमध्ये ते सोपे नव्हते. कारण चेंडू इकडे तिकडे फिरत होता, परंतु अभिषेक आणि ऋतुराज गायकवाड यांनी शानदार खेळी केली. पहिल्या सामन्यात दबाव हाताळता आला नाही. हा एक तरुण संघ आहे आणि त्यापैकी बरेच आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी नवीन असल्याचं शुबमन गिल सामना संपल्यानंतर म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

SCROLL FOR NEXT