tilak varma twitter
Sports

IND vs WI : तिलक वर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? महत्त्वाच्या सामन्याआधी प्लेईंगवर ११ वर अपडेट

Tilak Varma batting position vs West Indies : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महत्त्वाच्या टी२० सामन्यापूर्वी तिलक वर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत मोठी अपडेट समोर आली असून टीम इंडियाच्या प्लेइंग ११ वरही चर्चा रंगली आहे.

Namdeo Kumbhar

India playing XI news : टी२० विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज विजय अनिवार्य झालाय. कोलकात्यामधील इडन गार्डनर मैदानात भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 'करो या मरो'चा सामना होणार आहे. सायंकाळी सात वाजता दोन्ही संघ भिडतील, पण याच महत्त्वाच्या सामन्यापूर्वी, भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. तिलक वर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? याबाबतची अपडेट समोर आली आहे.

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेट यांनी तिलक वर्माच्या फलंदाजी क्रमाची माहिती दिली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध चेन्नईत झालेल्या सामन्यात वर्माला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात तिलकने फक्त १६ चेंडूत नाबाद ४४ धावांचा पाऊस पाडला होता. त्याने हार्दिक पाड्यासोबत पाचव्या विकेटसाठी फक्त ४१ चेंडूत ८४ धावांची जबरदस्त भागीदारी केली. भारताच्या विजयाचा पाया रचला होता.

तिलक वर्मा विडिंजविरोधात पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, हे अद्यप निश्चित नाही. आमच्याकडे आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही तिलक वर्माला संजू सॅमसनसह टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना पाहिले आहे. विरोधी संघाच्या प्लानिंगनुसार आम्ही फलंदाजीत बदल करू शकतो. १० षटकानंतर फलंदाजी करायला तिलक वर्मा लयीत दिसले. ही त्याच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असल्याचे टेन डोइशेटने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतीय प्रशिक्षक म्हणाले, तिलक वर्माच्या फॉर्मबाबत आम्हाला चिंता नाही. चार आठवडे मैदानाबाहेर राहिल्यानंतर हळूहळू लयीत परतणे सामान्य आहे. त्याला त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतताना आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळताना पाहून खूप आनंद झाला. मधल्या फळीत मजबूत फलंदाज आहेत हे महत्त्वाचे आहे.

भारत :

अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन/रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

वेस्ट इंडिज:

ब्रँडन किंग, शाई होप (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शमर जोसेफ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या मोर्चावेळी का संतापल्या टीना चौधरी? गिरीश महाजनांबाबत काय म्हणाल्या?

Fake Ghee Racket: गावरान तूप नाही तर चक्क जनावरांची चरबी, किळसवाण्या कारखान्याचा पर्दाफाश

स्वस्त गॅससाठी व्यावसायिकांचा जीवाशी खेळ; गॅस रिफिलचा व्यावसायिकांकडून गैरवापर?

BJP- Shivsena Alliance: भाजप- शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या शिलेदारानेच उघडले पत्ते

Shocking News: पोलिस महानिरीक्षकांवरच गंभीर गुन्हा दाखल; बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप

SCROLL FOR NEXT