Sports

T20 World Cup: सॅमसनचा वेस्ट इंडीजवर एअरस्ट्राईक! करो या मरो युद्धात भारताचा धमाकेदार विजय, सेमीफाइनलमध्ये दणक्यात एन्ट्री

टी२० विश्वचषक २०२६ च्या ५२ व्या सामन्यात भारत वेस्ट इंडिजचा सामना करत आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या सुपर ८ सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Bharat Jadhav

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता ५ मार्च रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होईल. भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला. टीम इंडियाने हा सामना ५ विकेट्सने जिंकून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. या वर्ल्डकपच्या चारही सेमीफायनलमधील संघांची नावे निश्चित झाली आहेत.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ४ विकेट्स गमावून १९५ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने १९६ धावांचे हे लक्ष्य शेवटच्या षटकात पूर्ण केले. यासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. या मैदानावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे.

भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला. १९६ धावांच्या प्रत्युत्तरात, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. पण अभिषेक शर्माने पुन्हा एकदा निराशा केली. तो ११ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा काढून बाद झाला. इशान किशननेही ६ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा केल्या.

दोन विकेट पडल्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी ३५ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली. १६ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केल्यानंतर सूर्याही बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने १५ चेंडूत २७ धावांची जलद खेळी केली. हार्दिकने १४ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून शिवम दुबे आणि संजू सॅमसन नाबाद राहिले. सॅमसनने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह ९७ धावा काढल्या. दुबे ४ चेंडूत ८ धावांवर नाबाद राहिला.

संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. १०४ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत १२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. टी२० विश्वचषक धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी होती. यापूर्वी ८२ धावांचा हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT