Wakad Tourism: एका दिवसाच्या सुट्टीत फिरून यायचंय? वाकडजवळच्या 'या' ठिकाणांचा अनुभन तुम्ही घेतलाच पाहिजे

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

एकच दिवस सुट्टी असल्यास लांबचा प्रवास करण्यापेक्षा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठिकाणं निवडल्यास प्रवासाचा वेळ कमी होतो. वाकडहून पाशाण, बाणेर आणि मरुंजी परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी सहज जाता येतं. पावसाळ्यात या परिसरातील टेकड्या आणि हिरवाई अधिक खुलून दिसते.

Monsoon weekend getaways Pune | saam tv

विकेंडसाठी प्लान करताय

पावसाळ्यात पुण्याच्या आसपासच्या टेकड्या, तलाव आणि इतर परिसर हिरवागार होतो. त्यामुळे ट्रेकिंग, निवांत फेरफटका किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणं योग्य ठरू शकतात.

One day trip near Pune | saam tv

वाकडमध्येच फिरण्यासाठी अनेक पर्याय

पुण्यातील वाकड परिसरातही फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, त्यामुळे प्रत्येक वेळी लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. यापैकी काही ठिकाणी सकाळी किंवा संध्याकाळी वेळ घालवता येतो, त्यामुळे कमी वेळेतही छोटासा विकेंड प्लॅन करता येतो.

Weekend destinations near Pune | saam tv

पाशाण तलाव

पाशाण तलाव हा पाशाण परिसरातील प्रसिद्ध तलाव असून वाकडपासून रस्त्याने सुमारे ८ किलोमीटर अंतरावर आहे. तलावाच्या परिसरात हिरवाई आणि शांत वातावरण अनुभवता येत असल्याने सकाळचा किंवा संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी हे ठिकाण चांगला पर्याय ठरू शकतो.

Baner Hill | saam tv

बाणेर टेकडी

बाणेर टेकडी ही पुण्यातील लोकप्रिय टेकडी असून बाणेर परिसरातून याठिकाणी जाण्याचे ट्रेकिंग मार्ग आहेत. टेकडीवरून परिसराचं सुंदर विहंगम दृश्य पाहता येते आणि पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर हिरवागार दिसतो.

Bird Valley Garden | saam tv

बर्ड व्हॅली गार्डन

बर्ड व्हॅली गार्डन हे चिंचवडमधील उद्यान असून वाकड परिसरातून याठिकाणी जाता येतं. उद्यानात हिरवाई आणि तलावाचा परिसर असल्यामुळे कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी हा पर्याय योग्य ठरतो.

Pune monsoon travel | saam tv

मरुंजी हिल्स

मरुंजी हिल्स हे वाकड-पिंपरी-चिंचवड परिसराच्या जवळ असलेलं टेकडीचं ठिकाण असून याठिकाणहून आसपासच्या परिसराचं दृश्य दिसतं. पावसाळ्यात टेकडीवरची हिरवाई आणि ढगाळ वातावरण या ठिकाणाचं सौंदर्य वाढवतं.

One day picnic near Pune | saam tv

Milk: दूध प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk | saam tv
येथे क्लिक करा