team india saam tv
क्रीडा

IND vs WI 3rd ODI: अंतिम वनडे सामन्यात पाऊस ठरणार व्हिलन? पाहा कसे असेल हवामान

IND vs WI 3rd ODI Weather Update: त्रिनिदादच्या मैदानावर भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे

Ankush Dhavre

India vs West Indies 3rd ODI: त्रिनिदादच्या मैदानावर भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या वनडे सामन्याचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून मिळवला होता.

तर दुसऱ्या वनडेत वेस्टइंडीजने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सामन्याचा खेळ बिघडवण्यात पावसाने कुठलीच कसर सोडली नव्हती. मात्र हा सामना पूर्ण झाला होता. आता अंतिम सामन्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या.

मालिकेतील तिसरा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर रंगणार आहे. या निर्णायक सामन्यात पाऊस आणि ऊन एकत्र पाहायला मिळू शकतात. हा सामना स्थानिक वेळेनुसार १० वाजता सुरू होईल.

सकाळी ७ वाजता पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर १० वाजता पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. दुपारी २ वाजता देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पावसामुळे या सामन्यात विघ्न येऊ शकतात. जर पावसामुळे हा सामना रद्द केला गेला तर ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त होईल.

दुसऱ्या वनडेत भारतीय संघाचा पराभव..

भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील दुसरा वनडे सामना बार्बाडोसच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मालिकेतील अंतिम सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असणार आहे. (Latest sports updates)

अशी असू शकते प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calculator: कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात? कोणालाच माहित नाही

Diabetes Warning Signs: डायबेटीज रूग्णांना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; संकेत समजून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

SCROLL FOR NEXT