team india saam tv
Sports

IND vs WI Weather Update: टीम इंडियाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगणार? दुसऱ्या कसोटीपूर्वी समोर आली मोठी अपडेट

IND vs WI 2nd Test Weather Report: या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता. २० जुलैपासून मालिकेतील दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्कच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण दोन्ही संघांमधील हा १०० वा सामना असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. (IND vs WI Weather Update)

क्वीन्स पार्कच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, त्रिनिदादमध्ये २० जुलै रोजी पाऊस पडण्याची शक्यता ४५ टक्के इतकी आहे.

सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे धुतला जाऊ शकतो. तर संध्याकाळी ४ च्या सुमारास आभाळ मोकळं होऊ शकतं, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest sports updates)

२१ वर्षांपासुन भारताचा विजयरथ सुरूच..

भारतीय संघाने २००२ मध्ये वेस्टइंडीजविरूद्ध खेळताना शेवटची कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ८ मालिका खेळल्या गेल्या आहेत.यापैकी ४ मालिका भारतात तर ४ मालिका वेस्टइंडीजमध्ये खेळल्या गेल्या आहेत. या सर्व मालिकांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे.

यावेळी देखील भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाला ही मालिका जिंकून आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याची नामी संधी असणार आहे. भारतीय संघाने वेस्टइंडीजमध्ये एकूण ५२ कसोटी सामने खेळले आहेत.

ज्यात भारतीय संघाने १० कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर १६ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर २६ कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

Maharashtra Live News Update : शिर्डीत साई मंदिरात भक्तिमय वातावरणात दत्त जन्माचे स्वागत

Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

Hedavi Travel : अथांग पसरलेला समुद्रकिनारा अन् गणेशाचे मंदिर; कोकणातील पर्यटनाची शोभा वाढवते हेदवीचं सौंदर्य

Dal Bhaji Recipe : विदर्भात बनवतात तशी चमचमीत डाळ भाजी, हिवाळ्यात एकदा ट्राय कराच

SCROLL FOR NEXT