Team India Head Coach: टीम इंडियाला नवा हेड कोच मिळणार! वेस्टइंडीज दौऱ्यानंतर BCCI घेणार मोठा निर्णय

VVS Laxman: ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड संघाविरुद्व दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
rahul dravid
rahul dravid saam tv
Published On

India Tour Of Ireland: भारतीय संघ सध्या वेस्टइंडीज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड संघाविरुद्व दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते.

rahul dravid
Who Is Carlos Alcaraz: जोकोविचला पराभूत करणारा नवा विम्बल्डन सम्राट कार्लोस अल्कारेझ आहे तरी कोण?

भारतीय संघाला मिळणार नवा मुख्य प्रशिक्षक.. .

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफला वेस्टइंडीज दौऱ्यानंतर विश्रांती दिली जाणार आहे. तर नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचे चीफ व्हीव्हीएस लक्ष्मणची आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली जाणार आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य वेस्टइंडीजविरुद्धची टी-२० मालिका झाल्यांनतर मायदेशी परतणार आहेत. ज्यात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडसह गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रेचा समावेश आहे. (Latest sports updates)

rahul dravid
Jasprit Bumrah Comeback: टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार! जसप्रीत बुमराह 'या' मालिकेतून करणार कमबॅक

या कारणामुळे दिली जाणार विश्रांती..

आयर्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत राहुल द्रविडला विश्रांती देण्याचं प्रमुख कारण असं की, ३१ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची रणनीती आखण्यासाठी राहुल द्रविडला पुरेसा वेळ मिळायला हवा.

आशिया चषक स्पर्धा झाल्यानंतर लगेचच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे राहुल द्रविडला विश्रांती करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही.

rahul dravid
IND vs WI 1st Test: विंडीजविरुद्ध अश्विनची सिंहगर्जना! तब्बल 12 विकेट्स घेत 'या' मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

क्रिकबझच्या वृत्तानुसार, राहुल द्रविडच्या जागी ही जाबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण पार पाडताना दिसून येऊ शकतात. तर सीतांशू कोटक किंवा हृषीकेश कानिटकरपैकी एक जण फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात.

तर ट्रॉय कुली किंवा साईराज बहुतुलेपैकी एक जण गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात. मागच्या वेळी जेव्हा भारतीय संघाने आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी देखील व्हीव्हीएस भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com