team india saam tv
Sports

IND vs WI 1st Test Result: अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजचा संघ गारद! पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा 1 डाव अन् 141 धावांनी विजय

IND vs WI 1st Test: भारत विरूद्ध वेस्टइंडीज यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकाच्या मैदानावर पार पडला

Ankush Dhavre

IND vs WI 1st Test Highlights: भारत विरूद्ध वेस्टइंडीज यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिकाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला आहे. (IND vs WI 1st Test Match Result)

यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाजांकडून दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ४२१ धावा करत डाव घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा डाव अवघ्या १३० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून आर अश्विनने सर्वाधिक ७ गडी बाद केले.

या सामन्यात वेस्टइंडीज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला होता. या डावात आर अश्विनने सर्वाधिक ५ गडी बाद केले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने जोरदार शतकी खेळी करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली.

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी २२९ धावांची भागीदारी केली. रोहित १०३ तर यशस्वी जयस्वाल १७१ धावांची खेळी करत माघारी परतला. तर विराट कोहलीने ७६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने पहिला डाव ४२१ धावांवर घोषित केला. यासह २७१ धावांची आघाडी घेतली. (Latest sports updates)

आर अश्विनची दमदार गोलंदाजी..

सामन्याच्या तिसऱ्या दिवसातील दुसरे सत्र सुरू झाल्यानंतर ५० षटकांचा खेळ शिल्लक होता. इथून आर अश्विनने वेस्टइंडीजच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवायला सुरुवात केली. अवघ्या ५८ धावसंख्येवर वेस्टइंडीजचा अर्धा संघ तंबूत परतला होता.

या डावात अश्विनने ७ गडी बाद केले. तर दोन्ही डावात मिळून त्याने १२ गडी बाद केले. दरम्यान १७१ धावांची खेळी करणारा यशस्वी जयस्वाल सामन्याचा हिरो ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; दुध टँकरची ट्रकला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT