team india
team indiasaam tv

Asian Games 2023: एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा! मराठमोळ्या ऋतुराजला मिळाली मोठी जबाबदारी

Team India Squad For Asian Games: १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
Published on

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआयने) आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. तर आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील या स्पर्धेसाठी संधी दिली गेली आहे.

team india
Yashasvi Jaiswal Records: गावसकर अन् सेहवागलाही नाही जमलं ते यशस्वीने करून दाखवलं! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

या स्पर्धेसाठी भारतीय संघातील युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. ज्यात आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी करणाऱ्या रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग, तिलक वर्मा आणि जितेश शर्मा सारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

तर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही.या संघाची घोषणा होण्यापूर्वी असे म्हटले जात होते की,शिखर धवनला या संघाचं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं. मात्र त्याला या संघात देखील स्थान दिलं गेलं नाही. (Latest sports updates)

team india
Rinku Singh Team Selection: IPL गाजवलेल्या रिंकू सिंगचे नशीब फळफळले; BCCI ने घेतला मोठा निर्णय

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ..

ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (यष्टिरक्षक).

राखीव खेळाडू: यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com