Indian batters walk back to the pavilion after a disappointing performance against USA in the T20 World Cup match at Wankhede Stadium. saam tv
Sports

वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या USA विरुद्ध भारताचे ५ धुरंधर फुस्स्ssss, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

IND vs USA T20 World Cup : भारत आणि अमेरिका यांच्यातील टी-२० विश्वचषक सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरलीय.

Bharat Jadhav

  • टी२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताची फलंदाजी फसली

  • टॉप ५ भारतीय फलंदाज अपयशी ठरले

  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली

टी२० वर्ल्ड कपची सुरुवात झाली असून आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसएच्या संघ आमनेसामने आलेत. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने अमेरिकेला विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य ठेवलंय. भारतीय संघ गतविजेता आहे आणि या स्पर्धेत आपले जेतेपद राखण्याचे त्यांचे ध्येय आहे. पण पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील टॉपचे फलंदाज अपयशी ठरलेत.

२०२६ च्या टी२० विश्वचषकात टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेनुसार झाली नाही. अमेरिकेविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये त्यांची फलंदाजी ढेपाळली. भारतीय संघाचे तीन फलंदाज पावरप्लेमध्ये गारद झाले. त्यामुळे टीम इंडियाची स्थिती दयनीय झाली होती. पॉवरप्लेच्या अखेरीस भारताचे चार टॉप-ऑर्डर फलंदाज डगआउटमध्ये परतले होते. भारतीय संघाची धावसंख्या ५० पर्यंतही पोहोचली नव्हती. पॉवरप्लेच्या अखेरीस भारताची स्थिती ४ बाद फक्त ४६ होती.

फटकेबाजी करणारी रिंकू सिंग, हार्दिकची जोडी अपयशी

पॉवरप्लेनंतर काही क्षणांसाठी असे वाटले की सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग हे ढासळत्या डावाला संभाळतील. पण ही जोडी १२ व्या षटकापूर्वीच तुटली. रिंकू सिंग १४ फक्त ६ धावा करून बाद झाला. रिंकू सिंग बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या मैदानावर आला. पण तो देखील अपयशी ठरला. अमेरिकेविरुद्ध हार्दिक फक्त पाच धावा करू शकला. त्यावेळी भारताचा डाव ७७ धावांवर पोहोचला होता. ७७ धावांवर निम्म संघ तंबूत परतला होता. दरम्यान प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध टी-२० मध्ये इतक्या कमी धावसंख्येत ६ विकेट गमावण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे.

अभिषेक आणि शिवमही अपयशी

बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये परतलेल्या टॉप सहा फलंदाजांमध्ये तिलक वर्माने सर्वाधिक २५ धावा केल्या होत्या. तर इशान किशनने २० धावा केल्या होत्या. इशान किशनला १० धावांवर जीवनदान मिळाले होते, पण त्याला त्याचा फायदा उठवता आला नाही. शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांना तर खातं खोलता आलं नाही. दोन्ही फलंदाज गोल्डन डकवर बाद झाले.

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. २०२६ च्या विश्वचषकापूर्वी २०१० आणि २०१६ च्या विश्वचषकात असे घडले होते. पॉवरप्लेमध्ये चार विकेट गमावल्यानंतर भारताने मागील दोन्ही वेळा पराभव पत्करला. त्यावेळी भारत धावांचा पाठलाग करत होता. पण आजच्या सामन्यात टीम इंडिया अमेरिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलीस अधिकाऱ्याविरोधातील आमदार खासदारांचे आंदोलन स्थगित

'सूर्योदय' जाहला...वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमारचं तुफान, USA समोर १६२ धावांचं टार्गेट

Shocking News: जत्रेतला पाळणा कोसळला, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू; थरकाप उडणारा VIDEO समोर

Maharashtra ZP Election Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्येची युतीची सत्ता? एमआयएमचा रंग पडणार फिका

ZP निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष; अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर, सामचा एक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT