Virat Kohli Record Against Srilanka Saam tv news
Sports

IND vs SL Records: टीम इंडियाचा हा वाघ श्रीलंकेवर एकटा भारी पडणार! पाहा गोलंदाजांची धडकी भरवणारा रेकॉर्ड

Virat Kohli Record Against Srilanka: भारतीय संघाचा हा फलंदाज श्रीलंकेवर नेहमीच भारी पडतो.

Ankush Dhavre

Virat Kohli Record Against Srilanka:

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३३ वा सामना रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळणार आहे.

त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघातील असा एक फलंदाज आहे जो श्रीलंकेवर भारी पडू शकतो.

भारतीय संघातील फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २५०५ धावा केल्या आहेत.

यादरम्यान त्याने १० शतक आणि ११ अर्धशतक झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्ध खेळताना नाबाद १६६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. या सामन्यात त्याला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.

कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत ४८ शतकं झळकावली आहेत. तर सचिनच्या नावे ४९ शतकं झळकावण्याची नोंद आहे. आता विराटला सचिनच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहितचा दमदार रेकॉर्ड..

श्रीलंकेविरुद्ध खेळताना रोहितची बॅटही चांगलीच तळपते. त्याने श्रीलंकेविरुद्ध ५१ सामने खेळले आहेत.यादरम्यान त्याने ६ शतकं आणि ७ अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान त्याने १८६० धावा केल्या आहेत.

मुख्य बाब म्हणजे रोहितने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी श्रीलंकेविरुद्ध खेळताना केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळताना २६४ धावांची खेळी केली होती.

या सामन्यासाठी अशी असु शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT