IND vs SL Twiiter/ @BCCI
Sports

IND vs SL: दिपक चहरनंतर आता 'हा' दिग्गज खेळाडू मालिकेतून बाहेर

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील खेळवली जाणार आहे.

वृत्तसंस्था

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील खेळवली जाणार आहे. त्यातला पहिला सामना गुरुवारी, 24 फेब्रुवारी रोजी लखनौच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या T20 मालिकेत दुखापत झालेला भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहर श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर पडला आहे. यासोबतच चहरला (Deepak Chahar ruled out) आयपीएलचे पहिले काही सामने खेळायलाही मुकावे लागू शकते. त्यानंतर भारताला दुसरा धक्का बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवही (Suryakumar Yadav Injured) फ्रॅक्चरमुळे श्रीलंका दौऱ्यातून बाहेर पडला आहे.

बीसीसीआयने (BCCI) म्हटले आहे की सूर्यकुमार यादवला हेअरलाइन फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे तो 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याला ही दुखापत केव्हा झाली याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघासाठी हा दुसरा धक्का आहे कारण दीपक चहरही दुखापतीमुळे एक दिवस आधीच मालिकेतून बाहेर पडला आहे. सूर्यकुमार यादवला वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यात ही दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना सूर्यकुमारला हेअरलाइन फ्रॅक्चर झाल्याची बातमी समोर आली होती.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सुर्यकुमार यादव मालिकेतून बाहेर पडला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याची देखरख करत आहे. आता दिपक चहर आणि सुर्यकुमार यादव आयपीएल खेळाणार का असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. अधिकाऱ्यांने सांगितले यांचा विकल्प नाही दिला कारण उपकर्णधार जसप्रित बुमराह संघात आधीच सामिल झाला आहेत.

भारत और वेस्टइंडीज के बीच तीन टी20 मैचों की सीरीज का आखिरी मुकाबला रविवार को कोलकाता के ईडन गॉडर्न्स में खेला गया था। वेस्टइंडीज ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। पहले बल्लेबाजी करते हुए भारत ने 5 विकेट के नुकसान पर 184 रन बनाए। जवाब में वेस्टइंडीज की टीम 20 ओवर में 9 विकेट के नुकसान पर 167 रन ही बना सकी।

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 5 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 167 धावाच करू शकला.

दीपक चहर डावातील तिसरे षटक टाकत होता. तिसर्‍या षटकाचा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी दीपक रनअप घेत होता की काहीशा अडचणीत दिसला. तो ओव्हरही पूर्ण करू शकला नाही आणि मैदानाबाहेर गेला. त्याचवेळी त्याच्या ओव्हरमधील शेवटचा चेंडू व्यंकटेश अय्यरने टाकला. तेव्हापासून चहर श्रीलंका मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT