Shreya Maskar
सातारा पश्चिम घाटात वसलेले ठिकाण आहे. हे ठिकाण ऐतिहासिक किल्ले, तलाव, धबधबे यासाठी प्रसिद्ध आहे.
साताऱ्यापासून सुमारे २० किमी अंतरावर ठोसेघर धबधबा आहे. हिरव्यागार टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या आणि खोल दरीत कोसळणाऱ्या या धबधब्याचा पावसात नजारा पाहून तुमचे मन भारावून जाईल.
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. येथे पाणी ५६० मीटर (सुमारे १,८४० फूट) उंचीवरून थेट खाली कोसळते.
महाबळेश्वरजवळ लिंगमळा धबधबा आहे. हा ५०० फूट (सुमारे १५० मीटर) उंचीचा धबधबा घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
कोयना वन्यजीव अभयारण्याच्या हिरव्यागार परिसरामध्ये ओझर्डे धबधबा आहे. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी १.५ किमीची निसर्गरम्य ट्रेक करावा लागतो.
कोयना दरीत वसलेला धोबी धबधबा ४५० फूट उंचीचा आहे. हा धबधबा त्याच्या आसपासच्या घनदाट जंगलातील ट्रेकिंगच्या वाटांसाठी प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वरमधील कोयना दरीच्या दक्षिण टोकावर चायनामेन्स फॉल्स धबधबा आहे. हा धबधबा दोन जलधारांच्या संगमातून बनला असून, तो ५०० फूट उंचीवरून खाली कोसळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.