IND vs SL 3rd T20 Team India won  SaamTV
क्रीडा

IND vs SL 3rd T20: टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये जिंकला शेवटचा T20 सामना, भारताकडून श्रीलंकेला क्लीन स्वीप

Bharat Jadhav

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ सामन्यांच्या T २० मालिकेतील शेवटचा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली होती, त्यामुळे भारतीय संघातील बेंचवर बसलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. हा सामना अतिशय रोमांचक झाला असून टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला.

भारताने दिलेल्या माफक १३७ धावांचे आव्हान पार करतांना श्रीलंकेच्या फलंदाजांना नाकीनऊ आले. रिंकू सिंह आणि सूर्यकुमारच्या गोलंदाजी पुढे लंकेच्या फलंदाजाकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्यांना मोठे फटके मारू दिलेच नाही शिवाय ते आपले गडी सुद्धा वाचवू शकले नाहीत. पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवने आज फलंदाजीत कमाल दाखवली नसली तरी गोलंदाजीत त्याने चमक दाखवली.

डेथ ओव्हरमध्ये एखाद्या पटाईत गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी केली. सूर्याने अखेरच्या टी२० सामन्याची शेवटची ओव्हर टाकली. यावेळी लंकेच्या संघाला ६ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या. फलंदाजांना मोठा फटका मारू दिला नाही. एखाद्या पूर्वेळच्या गोलंदाजाप्रमाणे चेंडू टाकत त्याने लंकेला फक्त ५ धावा दिल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.

या अखेरच्या टी२० सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. पण टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. यशस्वी जयस्वालने दुसऱ्याच षटकात १० धावांवर आपली विकेट गमावली. यानंतर संजू सॅमसन खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या रिंकू सिंहलादेखील मोठी धावसंख्या करता आली नाही. तोही अवघ्या १ धावसंख्येवर बाद झाला. तर स्वत: कर्णधार सूर्यकुमार यादवलाही केवळ ८ धावा करता आल्या. मालिकेतील पहिला सामना खेळत असलेल्या शिवम दुबेनेही केवळ १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा निम्मा संघ ४८ धावांवर तंबूत परतला होता.

मात्र शुबमन गिलने या सामन्यात संघाचा डाव सांभाळत ३७ चेंडूत ३९ धावा करून तो बाद झाला. तो बाद झाला तोपर्यंत संघाची धावसंख्या १०० धावांच्या पुढे गेली होती. यानंतर रायन परागने आणखी २६ धावा त्यात जोडल्या. तर वॉशिंग्टन सुंदरनेही २५ धावा करत एक सन्मानजनक धावसंख्या भारताला मिळवून दिली. भारतीय संघाने गिल, पराग आणि वॉशिंग्टन सुंदरच्या धावा सख्येच्या जोरावर २० षटकात ९ गडी गमावून १३७ धावा करू शकला. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना महिष थेक्षानाने सर्वाधिक ३ बळी घेतले. वानिंदू हसरंगानेही दोन गडी बाद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT