virat kohli google
Sports

IND vs SA: क्रिकेट इतिहासात जे कोणालाच नाही जमलं ते विराटने करुन दाखवलं! सचिन, संगकाराला मागे सोडत बनला नंबर १

Virat Kohli Record News: दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa, Virat Kohli Record News:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने १ डाव आणि ३२ धावांनी गमावला आहे. यासह गेल्या ३१ वर्षांपासून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघाचं स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विराट कोहलीने नाबाद ७६ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. जे १४६ वर्षांच्या इतिहासात कोणालाच नाही जमलं ते विराटने यावर्षी करुन दाखवलं आहे.

विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २०२३ वर्षातील शेवटची कसोटी इनिंग खेळण्यासाठी मैदानावर उतरला. त्याने या सामन्यातील दुसऱ्या डावात नाबाद ७६ धावा केल्या.

यासह त्याने २०२३ वर्षात २००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून २०२३ वर्षात २०४८ धावा केल्या आहेत. यासह सात कॅलेंडर वर्ष २००० किंवा त्याहुन अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी केवळ कुमार संगकाराला हा कारनामा करता आला होता. संगकाराने ६ कॅलेंडर वर्षात २००० किंवा त्याहुन अधिक धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच वर्षी सर्वाधिक वेळेस २००० धावा करणारे फलंदाज..

विराट कोहली- ७ वेळेस

कुमार संगकारा -६ वेळेस

महेला जयवर्धने - ५ वेळेस

सचिन तेंडूलकर- ५ वेळेस

जॅक कॅलिस- ४ वेळेस

विराट कोहलीने यापूर्वी २०१२,२०१४,२०१६,२०१७,२०१८ आणि २०१९ मध्ये २००० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर कुमार संगकाराबद्दल बोलायचं झालं तर त्याने २००४,२००६,२००९, २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये हा कारनामा केला होता. विराटने आतापर्यंत यावर्षी २०४८ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT