Virat Kohli performs a funny ‘Naagin Dance’ celebration after Quinton de Kock’s early dismissal in the Raipur ODI. saam tv
Sports

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Celebration Video: रायपूर वनडेमध्ये क्विंटन डी कॉकची विकेट घेतल्यानंतर विराट कोहलीचा 'नागिन डान्स' सेलिब्रेशन व्हायरल झालाय. वॉशिंग्टन सुंदरने शानदार कॅच घेतल्यानंतर कोहलीनं भन्नाट सेलिब्रेशन केलं.

Bharat Jadhav

  • डी कॉकचा झेल घेतल्यानंतर विराट कोहलीने केलेला नागीण डान्स व्हायरल

  • अर्शदीप सिंगनं डी कॉकला ८ धावांवर बाद केलं.

  • रायपूरमधील दुसऱ्या ODI सामन्यात भारताने शानदार फलंदाजी केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय रायपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करत आफ्रिकेसमोर ३६० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेनं २६ धावांवर पहिली विकेट गमावली. पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहलीनं केलेलं सेलिब्रेशन पाहून अनेकांना हसू आलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये खेळला जातोय. येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात आफ्रिकेच्या कर्णधाराचा निर्णय चुकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर ३६० धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना २६ धावांवर आफ्रिकेला पहिला धक्का मिळाला.

अर्शदीपनं दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. अर्शदीप सिंग डावातील ४ षटक टाकत होता. तर त्याचे वैयक्तिक २ षटक टाकत होता. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्कराम आणि क्विंटन डी कॉक यांनी डावाची सुरुवात केली. धमाकेदार सुरुवात केल्यानंतर अर्शदीपनं पहिला धक्का क्विंटन डी कॉक (८) च्या रूपात दिला. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर वॉशिंग्टन सुंदरने उत्कृष्ट झेल घेतला. वॉशिंग्टनं झेल घेतल्यानंतर विराट कोहलीची रिअॅक्शन जबरदस्त व्हायरल होत आहे.

क्विंटन डी कॉक हा आक्रमक फंलदाजी करणारा खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात क्विंटन डी कॉक यष्टीरक्षक आहे. पण त्याची फलंदाजी अफलातून आहे. त्याची विकेट भारतासाठी खूप महत्त्वाची होती. हीच महत्त्वाची विकेट भारताचा वेगवान खेळाडू अर्शदीप सिंगनं घेतली. अर्शदीपनं टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्विंटन डी कॉक वॉशिंग्टन सुंदरच्या हाती झेलबाद झाला.

त्यावेळी सर्व खेळाडू एकमेकांना टाळ्या देत सेलिब्रेशन करत होते. पण विराट कोहली नागीण डान्स करत होता. त्याने डान्स करत आनंद व्यक्त केला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Star Pravah Serials : नव्या वर्षात नवा बदल; स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांची वेळ बदलली, वाचा वेळापत्रक

2026 Astrology Predictions: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बनणार शुक्र-नेपच्युनची युती; या राशींना अफाट पैशांसह यशही मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्यात वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी युती नाही

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची खास पोस्ट, म्हणाल्या आजच

KDMC Seat Sharing : शिवसेना-भाजपचं जागावाटप ठरलं, कल्याणमध्ये कोण किती जागा लढणार? वाचा

SCROLL FOR NEXT