arshdeep singh google
क्रीडा

IND vs SA,3rd ODI: 'सिंग इज किंग', द.आफ्रिकेत अर्शदीपचा मोठा कारनामा; अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Ankush Dhavre

Arshdeep Singh Record News:

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये पार पडलेली टी-२० मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. आता वनडे मालिकेत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.

तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन यांनी मोलाची भूमिका बजावली. संजूने शतक झळकावलं, तर अर्शदीप सिंगने ४ गडी बाद केले. या कामगिरीच्या बळावर त्याने मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत.

अनिल कुंबळेंच्या रेकॉर्डची केली बरोबरी..

अर्शदीप सिंगने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह त्याने भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेत मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने या मालिकेत दुसऱ्यांदा ४ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.

याबाबतीत त्याने माजी भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. अनिल कुंबळे यांनी देखील हा कारनामा २ वेळेस करुन दाखवला होता. भारताचे फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या यादीत अव्वल स्थानी आहे.

तसेच दक्षिण आफ्रिकेतील एकाच वनडे मालिकेत १० गडी बाद करणारा तो दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०१०-११ मध्ये झालेल्या मालिकेत मुनाफ पटेलने हा कारनामा करुन दाखवला होता. (Latest sports updates)

भारत-दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेत सर्वाधिक वेळेस ४ गडी बाद करणारे गोलंदाज...

युजवेंद्र चहल -३ वेळेस

कुलदीप यादव- ३ वेळेस

सुनील जोशी- २ वेळेस

अनिल कुंबळे- २ वेळेस

अर्शदीप सिंग- २ वेळेस

दक्षिण आफ्रिकेत एकाच द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक वेळेस ४ किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणारे गोलंदाज..

केथ आर्थरटन - २ वेळेस (वेस्टइंडिज, १९९८/९९)

ब्रेट ली - २ वेळेस (ऑस्ट्रेलिया, २००१/०२)

युजवेंद्र चहल- २ वेळेस (भारत, २०१७/१८)

कुलदीप यादव - २ वेळेस ( भारत, २०१७/१८)

अर्शदीप सिंग- २ वेळेस (भारत, २०२३/२४)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT