दुसऱ्या कसोटीत टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.
ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दोन बदल केले.
पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा हा सामना जिंकण्यावर भर असेल.
बारसापारा स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला जात असून दोन्ही संघांनी मजबूत प्लेइंग ११ उतरवली आहे.
IND vs SA, 2nd Guwahati Test match updates : गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारतीय संघात महत्त्वाचे दोन बदल करण्यात आले आहेत. ऋषभ पंतच्या नेतृत्वात टीम इंडिया कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरत आहे. (India vs South Africa 2nd Test)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दुसऱ्या कसोटी सामन्यालासुरुवात झाली आहे. या सामन्यात पाहुण्या संघाने टॉस जिंकला असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाला होता, अशात हा सामना जिंकून बरोबरी करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या कसोटीत भारताचे नेतृत्व रिषभ पंत करणार आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर टेम्बा बावुमा म्हणाला, "आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागेल. खेळपट्टी खूपच चांगली दिसते. आम्ही प्रथम चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि नंतर तिथून खेळू. खेळपट्टीवर कोणतेही भेगा दिसत नाहीत. येथे खेळला जाणारा हा पहिलाच कसोटी सामना आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा भाग असल्याचा मला आनंद आहे. प्लेइंग ११ मध्ये एक बदल आहे."
ऋषभ पंत म्हणाला की, "हा अभिमानाचा क्षण आहे. मी याबद्दल विचार केला नव्हता, पण मला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे, परंतु प्रथम गोलंदाजी करणे हाही वाईट पर्याय नाही. भारतीय संघात दोन बदल करण्यात ाले आहेत.
यशस्वी जायस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, विआन मुल्डर, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को यान्सन, सेनुरान मुथुसामी, सायमन हार्मर, केशव महाराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.