ramandeep singh twitter
Sports

IND vs SA 3rd T20I: पहिल्याच बॉलवर Ramandeep Singhने रचला इतिहास! ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Ramandeep Singh Record: भारताचा स्टार फलंदाज रमनदीप सिंगने आपल्या पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Ankush Dhavre

Ramandeep Singh Record News In Marathi: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना सेंच्युरीयनच्या स्पोर्ट्स पार्कच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने आवेशने खानला बसवलं आणि रमनदीप सिंगला संधी दिली.

रमनदीप सिंग भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ११८ वा खेळाडू ठरला. हा पहिलाच सामना त्याच्यासाठी आठवणीतला ठरला आहे. कारण पहिल्याच सामन्यात त्याने असं काहीतरी केलं, जे केवळ सूर्यकुमार यादवलाच जमलं होतं.

असा रेकॉर्ड करणारा दुसराच भारतीय फलंदाज

रमनदीप सिंग हा भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना, पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापू्र्वी हा कारनामा केवळ सूर्यकुमार यादवला करता आला होता.

सूर्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता रमनदीप सिंगनेही हा कारनामा करुन दाखवला आहे.

रमनदीप सिंगला हार्दिक पंड्या आणि मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी पदार्पणाची कॅप दिली. रमनदीप सिंग हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासह तो गोलंदाजीतही योगदान देतो. मात्र त्याला या सामन्यात गोलंदाजीची संधीच दिली नाही. त्याचा आवेश खानच्या जागी समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला १ षटकही गोलंदाजीची संधी दिली नाही.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला २० षटकअखेर २१९ धावा करता आल्या. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाने हा सामना ११ धावांनी आपल्या नावावर केला. यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT