ind vs sa toss saam tv news
Sports

IND vs SA Match Timing: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्याची वेळ बदलली! किती वाजता सुरु होणार सामना?

India vs South Africa 2nd Test Match Time: भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa Match Timings And Match Details:

भारतीय संघ नवीन वर्षातील पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. भारतीय संघाला पहिल्या कसोटीत १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे.

गेल्या ३१ वर्षांपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. तसेच केपटाऊनच्या मैदानावरही भारतीय संघाला कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघाला इतिहास रचावा लागेल.

सामन्याच्या वेळेत बदल..

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पहिला कसोटी सामना दुपारी १:३० वाजता सुरू करण्यात आला होता. मात्र दुसरा कसोटी सामना दुपारी २ वाजता सुरू होणार आहे. पाचही दिवस सामना सुरू होण्याची वेळ हीच असणार आहे. (Latest sports updates)

भारत - दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना केव्हा खेळला जाणार आहे?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारी रोजी खेळला जाईल.

भारत - दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना केपटाऊनच्या मैदानावर खेळला जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना कुठे पाहता येईल लाईव्ह?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/मुकेश कुमार.

दक्षिण अफ्रीका:

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डिजॉर्जी, कीगन पीटरसन, जुबायर हमजा, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरीन (यष्टिरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज/लुंगी एन्गिडी, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

SCROLL FOR NEXT