सेंच्युरियनच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ३२ धावांनी गमावला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी उतरलेला भारतीय संघ प्रत्येक क्षेत्रात बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं. याउलट दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला फलंदाजी , गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात मागे सोडलं आहे. (Cricket News In Marathi)
दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांचं लोटांगण..
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवून ठेवलं.
उसळी घेणाऱ्या चेंडूंवर भारतीय फलंदाज टिकूच शकले नाही. अखेर भारताचा पहिला डाव अवघ्या २४५ धावांवर आटोपला. भारताकडून एकट्या केएल राहुलने १०१ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दुसऱ्या डावात विराटने नाबाद ७६ धावांची खेळी केली. (Latest sports updates)
आफ्रिकेचे गोलंदाज चमकले..
या सामन्यातील पहिल्या डावात कगिसो रबाडाने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर पदार्पणवीर नांद्रे बर्गरने ३ गडी बाद केले. सामन्यातील दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज भारतीय संघावर भारी पडले. दुसऱ्या डावात बर्गरने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मार्को यान्सेनने ३ आणि रबाडाने २ गडी बाद केले.
क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका..
भारतीय संघ जगभरात आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. मात्र या सामन्यात त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. भारतीय संघातील खेळाडूंनी स्लीपमध्ये सोपे झेल सोडले.
गोलंदाज ठरले फ्लॉप..
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात एकही फिरकी गोलंदाजाला संघात स्थान दिलं नव्हतं. तर दुसरीकडे भारतीय संघात आर अश्विनचा समावेश करण्यात आला. त्याला या संपूर्ण सामन्यात एक गडी बाद करता आला. दुसरीकडे वेगवान गोलंदाजही महागडे ठरले असून विकेट्स घेण्यात अपयशी ठरले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.