Rohit Sharma Statement: 'या चुका आम्हाला महागात पडल्या...',लाजिरवाण्या पराभवानंतर रोहित शर्माने केले ४ मोठे खुलासे

Rohit Sharma Statement News: या पराभवानंतर भारतीय संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं कारण सांगितलं आहे.
rohit sharma
rohit sharmagoogle
Published On

Rohit Sharma Reveals The Reason Behind Defeat Against South Africa In IND vs SA 1st Test:

दक्षिण आफ्रिकेत जाऊन दक्षिण आफ्रिकेला हरवण्याची संधी भारतीय संघाने पुन्हा एकदा गमावली आहे. सेंच्युरियन पार्कच्या मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Rohit Sharma Statement)

या पराभवानंतर भारतीय संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यानंतर काही मोठे खुलासे केले आहेत. त्याने पराभवाची काही कारणं सांगितली आहेत.तो म्हणाला की,'आम्ही या सामन्यात चांगलं खेळू शकलो नाही. आम्हाला धावफलकावर मोठी धावसंख्या लावायची होती. केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली. मात्र गोलंदाजांना परिस्थितीशी जुळवून घेता आलं नाही. दुसऱ्या डावात आमची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. दुसऱ्या डावात विराटने चांगली खेळी केली. मात्र जर तुम्हाला कसोटी मालिका जिंकायचा असेल तर तुम्हाला एकजुट होऊन खेळणं गरजेचं आहे. आम्ही असं करु शकलो नाही.' (Latest sports updates)

rohit sharma
WTC Points Table: दारुण पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का! WTC ची फायनल गाठणं कठीण

या कारणामुळे गमावला सामना..

'खेळाडूंना इथे खेळण्याचा अनुभव आहे. आमच्या फलंदाजांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला. हेच कारण आहे की, आम्ही पराभूत झालोय. या सामन्यातून काही सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. जास्त गोष्टी नाही कारण हा सामना तीन दिवसात समाप्त झाला.'

तसेच तो पुढे म्हणाला की,'या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी हे केएल राहुलने दाखवून दिलं आहे. मी गोलंदाजांना जास्त दोष देऊ शकत नाही. कारण त्यांना इथे खेळण्याचा अनुभव नाही. आम्ही एकत्र येऊ आणि पुन्हा एकदा कमबॅक करु. अशाप्रकारच्या पराभवातून सावरणं कठीण आहे. मात्र एक खेळाडू म्हणून तुम्हाला या गोष्टींना मागे सोडत पुढे निघावं लागतं.'

rohit sharma
IND vs SA 1st Test: हिटमॅन रोहितचा फ्लॉप शो; तब्बल सातव्यांदा बनला रबाडाचा शिकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com