team-india google
Sports

IND vs SA: ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका गाजवणाऱ्या खेळाडूला सूर्या बसवणार बाहेर; प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण?

Ravi Bishnoi: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa, Team India Playing XI:

बांगलादेशविरुद्धचा तो सामना कोणीच विसरु शकणार नाही. भारताचा युवा स्टार फलंदाज इशान किशनने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करत दुहेरी शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर पुढील मालिकेत त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली गेली नव्हती.

असच काहीतरी भारतीय संघातील युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईसोबत देखील होऊ शकतं. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी त्याला भारतीय संघात संधी मिळणं कठीण आहे. (Team India Playing 11)

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना आज डरबनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.तर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहे. या सामन्यासाठी या दोघांना मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी..

नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत, रवी बिश्नोईने सर्वाधिक ९ गडी बाद केले होते. भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. सध्या तो आयसीसीच्या टी-२० गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. असं असतानाही त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. (Latest sports updates)

रवी बिश्नोई बाहेर बसणार?

ही मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली जाणार आहे. इथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नाही. मालिकेतील पहिला सामना डरबनच्या किंग्समीडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

या मैदानावर शाहीद आफ्रिदीने सर्वाधिक ६ गडी बाद केले होते. हे पाहता भारतीय संघात २-३ फिरकी गोलंदाजांना संधी मिळणं कठीण आहे. भारतीय संघात रवी बिश्नोईसह रविंद्र जडेजासह आणि कुलदीप यादवला संधी दिली गेली आहे. जर प्लेइंग ११ मध्ये २ फिरकी गोलंदाज खेळवायचे असतील तर, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवला प्राधान्य दिलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

SCROLL FOR NEXT