IND Vs PAK T20 Saam Digital
Sports

IND Vs PAK T20 : टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढून घेतली; ४० दिवसांत तिसऱ्यांदा चारली धूळ

Women's Asia Cup T20 2024 : भारतीय महिला क्रिकेट संघाने अशिया कप 2024 च्या पहिल्याच टी-२० सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून दारून पराभव केला आहे. गेल्या ४० दिवसात भारतीय संघाने पाकिस्तानला तिसऱ्यांदा धूळ चारली आहे.

Sandeep Gawade

भारत क्रिकेट संघाने गेल्या ४० दिवसात पाकिस्तानच्या संघाला सलग तीनवेळा धूळ चारली आहे. 9 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने T20 विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव केला. त्यानंतर 13 जुलै रोजी हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली माजी खेळाडूंच्या संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. तर आजच्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने अशिया कप 2024 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून दारून पराभव केला आहे.

श्रीलंकेतील दांबुला येथे 8 व्या महिला आशिया कप टी-20 शुक्रवाही १९ जुलै रोजी सुरुवात झाली. विद्यमान चॅम्पियन भारतीय संघाची पहिल्याच दिवशी अ गटातील सामन्यात पाकिस्तानशी गाठ पडली. 2022 च्या आशिया चषक स्पर्धेतही दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 3 धावांनी पराभव केला होता. दरम्यान फॉर्मध्ये असलेल्या टीम इंडियाने पाकिस्तानला केवळ 108 धावांत गुंडाळलं आणि त्यानंतर 14.1 षटकांत केवळ 3 विकेट्स गमावून लक्ष्य पाकिस्तानचा पराभव केला.

पाकिस्तानची कर्णधार निदा दार हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी मैदानावर फार काळ टिकू दिलं नाही. टीम इंडियाची स्टार अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकर (2/14) हिने चौथ्या षटकात दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. इथून पुढे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्माने प्रत्येक एक गडी बाद केला. दीप्तीच्या एकाच षटकात धावबादसह 3 गडी बाद झाले. पाकिस्तानचा संघ 19.2 षटकात अवघ्या 108 धावांत गडगडला. पाकिस्तानच्या सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या, तर फातिमा सनाने 16 चेंडूत 22 धावांचं योगदान दिलं.

प्रत्युत्तारादाखल टीम इंडियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी पुन्हा एकदा अप्रतिम भागीदारी पहायला मिळाली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ९.३ षटकांत ८५ धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्मृतीने एकाच षटकात 5 चौकार लगावले. मात्र, तिचं अर्धशतक अवघ्या ५ धावांनी हुकलं. ती 45 धावा करून ती बाद झाली. शेफालीही 40 धावांची चांगली खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतली. टीम इंडियाने केवळ 14.1 षटकांत लक्ष्य गाठून स्पर्धेची सुरुवात दमदार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT