Sports

India vs Pakistan T20 WC 2026: टीम इंडियाची पाकड्यांना फुल टशन; सूर्याच्या स्वॅगने पाकिस्तानचा कर्णधार बुचकाळ्यात, मैदानात नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan T20: सूर्यकुमार यादवने सलमान आघाशी हस्तांदोलन करण टाळलंय. यामुळे पाकिस्तानी कर्णधाराला हताश झालाय.

Bharat Jadhav

  • भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठे बदल

  • अर्शदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं

  • कुलदीप यादव आणि अभिषेक शर्माला संधी

India vs Pakistan, T20 world Cup 2026 : टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना होतोय. टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांसमोर येण्याची ही नववी वेळ आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर येतात तेव्हा दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड उत्साह असतो.

या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव नाणेफेकीच्या वेळी पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करेल का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु भारतीय कर्णधाराने हस्तांदोलन न करण्याचे धोरण कायम ठेवले. त्याने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन केले नाही.

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराकडे पाहिलं सुद्धा नाही. नाणेफेकीनंतर, दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीच्या निवेदकांशी चर्चा केली आणि ते त्यांच्या डगआउट्समध्ये परतले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

२०२५ च्या आशिया कप दरम्यान हस्तांदोलन वाद निर्माण झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले. तिन्ही वेळा टीम इंडियानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा नियम पाळला.

त्यानंतर केवळ वरिष्ठ संघच नाही तर कनिष्ठ संघानेही हस्तांदोलन न करण्याचं धोरण पाळले. भारतीय कर्णधाराने या सामन्यातही तेच धोरण सुरू ठेवले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला हस्तांदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने म्हटलं की, क्रिकेटला खेळाच्या भावनाने खेळले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT