team india playing 11 prediction for ind vs pak match  saam tv
Sports

IND VS PAK, Playing XI: भारत- पाकिस्तान सामन्यात सूर्याला संधी मिळणार? पाहा महामुकाबल्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग 11

India vs Pakistan Playing 11 Prediction: या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाहा कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग 11

Ankush Dhavre

India vs Pakistan, Asia Cup 2023,Match Prediction And Playing 11:

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज आशिया चषकात बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना रंगणार आहे. २०१९ वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या एक दिवसापूर्वीच बाबर आझमने पाकिस्तान संघाच्या प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११.

भारतीय संघात बदल..

या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. केएल राहुलच्या अनुपस्थितीत ईशान किशनला संधी दिली जाणार आहे. मात्र तो कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला येणार हे स्पष्ट नाही.

त्याला वरच्या फळीत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तर गिल आणि विराट कोहली तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतात. शुभमन गिल आणि ईशान किशन पहिल्यांदाच पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.

मध्यक्रमात या फलंदाजांना मिळणार संधी...

या सामन्यात विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. त्यांनतर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर,सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजीला येऊ शकतो. या सामन्यात श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची चिन्ह असल्याने सूर्यकुमार यादवला संधी मिळणं कठीण आहे.

या गोलंदाजांना मिळू शकते

या संघात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात स्थान मिळणं निश्चित आहे. (Latest sports updates)

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या,कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT