क्रीडा

Babar Azam Wicket: बाबरला अतिआत्मविश्वास नडला; सिराजला कट मारायला गेला अन् फसला, पाहा VIDEO

Vishal Gangurde

Babar Azam Wicket News:

विश्वचषकातील हाय व्हॉल्टेज सामना भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघामध्ये रंगतदार सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाने एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमही अर्धशतक करताच तंबूत परतला. भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याला क्लीन बोल्ड केले. (Latest Marathi News)

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या संघात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

पाकिस्तानची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीकने पहिल्या गडीसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. मोहम्मद सिराजने या दोघांची भागीदारी मोडली.

अब्दुल्ला २४ चेंडूत २० धावांवर बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानला १३ व्या षटकात दुसरा धक्का बसला. हार्दिक पंड्याने इमाम उल हकला झेलबाद केले. इमाम ३८ चेंडूत ३६ धावा करून तंबूत परतला.

बाबर आझमचं अर्धशतक झाल्याने त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. बाबरने अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या चेंडूला कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी बाबरचा प्रयत्न फसला.

कट मारताना प्रयत्न फसल्याने बाबर आझम त्रिफळाचीत झाला. बाबर बाद झाल्याने पाकिस्तानला त्याच्या रुपात तिसरा धक्का बसला. बाबरने ५८ चेंडूत ५० धावा केल्या.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी ५० हून अधिक धावांची भागीदारी रचली. बाबर आझम कुलदीप यादवने २५ षटकातील तिसऱ्या चेंडूवर बाद करण्याचा प्रयत्न केला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,

पाकिस्तान संघ:

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हरिस रउफ, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT