India vs Pakistan: पाकिस्तानआधी डेंग्यूला हरवलं! टीम इंडियाचा ढाण्या वाघ डरकाळी फोडण्यास सज्ज

Shubman Gill World Cup Debut: शुभमन गिल वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
Shubman gill
Shubman gillTwitter
Published On

Shubman Gill World Cup Debut:

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हाय व्हॉल्टेज सामना भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यासाठी सलामीवीर फलंदाज शुभमन गिलला देखील भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

त्याला ईशान किशनच्या जागी प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान हा त्याचा वर्ल्डकप स्पर्धेतील पहिलाच सामना आहे.

आवडत्या मैदानावर गिलचं वर्ल्डकप पदार्पण..

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे शुभमन गिलचं आवडतं मैदान आहे. या मैदानावर खेळताना त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. तर याच मैदानावर त्याचं वर्ल्डकप स्पर्धेत पदार्पण झालं आहे.पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात शुभमन गिल रोहित शर्मासोबत डावाची सुरूवात करताना दिसून येईल.

Shubman gill
IND vs PAK Record: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच शेर!पाहा कसा राहिलाय IND vs PAK सामन्याचा आतापर्यंतचा रेकॉर्ड

सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये राहावं लागलं बाहेर...

शुभमन गिल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. मात्र वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी त्याला डेंग्यू झाला होता. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

त्यानंतर अफगाणिस्तान संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर राहावं लागलं होतं. मात्र आता पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे फिट झाला आहे.

Shubman gill
IND vs PAK, World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार? हवामान खात्याने दिली माहिती

अहमदाबादच्या मैदानावर असा राहिलाय रेकॉर्ड...

शुभमन गिलला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या मैदानावर खेळलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १२६ धावांची तुफानी खेळी केली होती.

तर आयपीएल स्पर्धतील ७ सामन्यांमध्ये त्याने ६७.३३ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ शतके आणि ९४ धावांची नाबाद खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात त्याने १२८ धावांची खेळी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com