विश्वचषक 2023 स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघामध्ये महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)
अशातच सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी अहमदाबादमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.
मात्र, पावसाचा अडथळा येण्याची शक्यता असली तरी सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. पावसामुळे काही काळ खेळ थांबू शकतो. याआधी आशिया चषक स्पर्धेतही भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. त्यातील एक सामना हा रद्द करावा लागला होता.
तर दुसरा सामना अतिरिक्त दिवशी पूर्ण करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस पुन्हा खोडा घालणार तर नाही ना? अशी चिंता क्रिडाप्रेमांना लागून आहे. दरम्यान, वर्ल्डकप इतिहासात आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा संघ ७ वेळा आमने-सामने आले आहेत.
यातील सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही विजय मिळवून भारताचा विजयी परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. भारतीय संघ सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल , विराट कोहली, श्रेयस अय्यर , केएल राहुल , रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , मोहम्मद शमी , रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान , इमाम-उल-हक , अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ , हसन अली , शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.