sharad pawar celebrate victory Saam Tv
क्रीडा

भारताने पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय; शरद पवारांनी केले खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ

टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने विजयाचा षटकार मारत विजय खेचून आणला.

Santosh Kanmuse

मुंबई: टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी खास सेलिब्रेशन केले आहे. दुबईत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने हा विजय संपादन केला. गेल्यावर्षी भारतीय संघाला पाकिस्तानकडून लाजीरवाना पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने विजयाचा षटकार मारत विजय खेचून आणला. शेवटपर्यंत हा सामना रोमहर्षक राहिला.

टीम इंडियाच्या (Team India) विजयानंतर देशभरात जल्लेष साजरा केला जात आहे. रात्री बारा वाजताच फटाक्यांची आतिषबाजी करत अनेकांनी जल्लोष केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही जल्लोष केला आहे, जल्लोषाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शरद पवार (Sharad Pawar) आपले दोन्ही हात उंचावून त्यांनी विजयी सेलिब्रेशन केले, तसेच भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पवार यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी भारत विरुद्ध पाकिस्तान या संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्याचा आनंद घेतला. ते आपल्या नातवांसोबत सामना पाहत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या जल्लोषाचे कौतुक होत आहे.

आशिया कप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाने (Team India) विजयी सुरूवात केली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने ५ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने गेल्या वर्षी झालेल्या विश्वचषकाचादेखील वचपा काढला. भारताला शेवटच्या तीन चेंडूत ६ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : दादरमध्ये उद्धव ठाकरेंचा झेंडा फडकणार, युवा सेनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT