नवी दिल्ली: आजच्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या हार्दिक पांड्याने विजयाचा षटकार मारत विजय खेचून आणला. शेवटपर्यंत हा सामना रोमहर्षक राहिला. टीम इंडियाही सामन्याच्या शेवटला दडपणाखाली आली होती, पण हार्दिक पांड्याने विजय खेचून आणला. या विजयातील ६ कारणे आता आपण पाहणार आहोत.
टीम इंडियाच्या (Team India)गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच पाकिस्तानच्या खेळाडूंवर दबाव बनवून ठेवला. नाणेफेक जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला. भुवनेश्वर कुमारने बाबर आझमला बाद करून पाकिस्तानला पहिली झटका दिला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला बॅकफूटवर ठेवले. भुवीने चार आणि हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानला दबावात ठेवण्यासाठी संपूर्ण रणनीती चांगली ठेवली. गोलंदाजांनी सुरुवातच चांगली केल्यामुळे पाकिस्तानचे खेळाडू दबावात राहिले. याचा फायदा पुढे टीम इंडियाला झाला. रोहितने भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांना वेळीच षटक टालण्याची संधी दिल्यामुळे पाकिस्तानला रोखता आले.
टीम इंडियाने (Team India) आजच्या सामन्यात क्षेत्ररक्षण उत्कृष्ठ पुध्दतीने केले. पाकिस्तानच्या खेळाडूंनी ठोकलेला प्रत्येक चेंडू अडवण्याचे काम टीम इंडियाने केले, त्यामुळे पाकिस्तान टीम मोठ्या धावांपासून दूर राहिली. पाकिस्तानला १५० च्या पुढे जाण्यास रोखण्यात क्षेत्ररक्षण महत्वाचे ठरले.
टीम इंडियाकडून (Team India) सुरुवातीला केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. पण पाकिस्तानच्या नसीम शाहने केएल राहुलची विकेट घेतली. त्यामुळे टीम इंडियावर दबाव आला होता, पण पुढ विराट कोहली आणि रोहितने डाव सांभाळला. पण हे दोघंही खेळाडू पुढ झेलबाद झाले. पुढ संघाची सर्व जबाबदारी मधल्या फळीतील खेळाडूंवर पडली. यात रविंद्र जडेजाने चांगली खेळी करत संघाची कमान सांभाळली, आणि शेवटला हार्दिक पांड्याने विजय खेचून आणला.
टीम इंडियाकडून (Team India) सुरुवातीला केएल राहुल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. पण पाकिस्तानच्या नसीम शाहने केएल राहुलची विकेट घेतली, त्यामुळे टीम इंडियावर दबाव आला होता. यानंतरही पाकिस्तानच्या गोलंदाजांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना बाद केले. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला होता. पण मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली खेळी सुरू ठेवली. पुढ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी वाईल चेंडूही टाकले. या गोलंदाजांना रविंद्र जडेजाने चांगलेच ठोकले. यानंतर शेवटच्या काही षटके पाकिस्तानच्या बॉलरांचे खराब पडले, याचा फायदा टीम इंडियाने घेतला.
टीम इंडियाचा (Team India) ऑलराऊंडर असणारा हार्दिक पांड्याने आज जोरदार खेळी केली. त्याने सुरुवातील गोलंदाजीमध्ये पाकिस्तानचे तीन मोठे बळी घेतले. हे तीन बळी घेत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग हार्दिकने सुकर केला. तर फलंदामध्येही जोरदार खेळी करत विजय खेचून आणला. टीम इंडियाच्या सुरुवातीच्या फळीतील फलंदाज लगेच गारद झाले, त्यामुळे संघाची जबाबदारी मधल्या फळीतील फलंदाजांवर येऊन पडली. यात रविंद्र जडेजाने चांगली खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण अखेर जडेजाही बाद झाला. पुढची सर्व जबाबदारी हार्दिकवर (Hardik Pandya) आली. हार्दिकने टीमची कमान सांभाळत विजय खेचून आणला. विशेष म्हणजे हार्दिकने विजयी षटकार मारत विजयी जल्लोष केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.