“Asia Cup 2025: Suryakumar Yadav refuses handshake with Pakistan captain at toss. saamtv
Sports

IND vs PAK, Asia Cup: पुन्हा तेच! हॅण्डशेक न मिळवता कर्णधार सूर्याकुमारनं पाकिस्तानला पुन्हा जागा दाखवली

IND vs PAK, Asia Cup: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान कर्णधाराशी हात मिळवण्यास नकार दिलाय. दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानविरुद्ध हॅण्डशेक न करण्याचे धोरण सूर्यकुमार यादवने कायम ठेवलं.

Bharat Jadhav

  • आशिया कप २०२५ मध्ये पुन्हा हॅण्डशेक वाद उफाळला.

  • कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हॅण्डशेक करण्यास नकार दिला.

  • नाणेफेक भारताने जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

यंदाचा आशिया कप २०२५ टुर्नामेंटमध्ये ड्राम्यामुळे खूप चर्चेत आहे. आज होत असलेल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या कर्णधाराने पु्न्हा एकदा पाकिस्तानच्या कर्णधाराशी हॅण्डशेक करण्यास नकार दिला. सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध हात न मिळवण्याचे धोरण कायम ठेवलं. दुबई येथे झालेल्या त्यांच्या पहिल्या सुपर फोर सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

नाणेफेक जिंकल्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, शनिवारी सराव दरम्यान दव पडले होते. त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ''पहिल्या डावात गोलंदाजी करणार. खेळपट्टी चांगली आहे आणि काल दव पडले होते. पहिल्या डावात आम्हाला वाटत होते की आम्ही बाद फेरीत खेळत आहोत, काहीही बदलले नाही. अबूधाबीमध्ये पूर्णपणे वेगळी विकेट होती. अगदी सामान्य, फक्त दुसरा सामना आहे.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला की, त्यांच्या संघाने प्रथम गोलंदाजी करणे पसंत केले असते. परंतु नवीन आव्हानाचे स्वागत केले असते. "आधी गोलंदाजीही केली असती." हा एक नवीन सामना आहे, नवीन आव्हान आहे. वातावरण अगदी सामान्य आहे. खेळपट्टी हळू दिसतेय. बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली सुरुवात करायची आहे. दोन बदल. हसन नवाज आणि खुशदिल शाह खेळत नाहीत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update : मुंबई मेट्रो ३ बंद पडली

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

SCROLL FOR NEXT